कृषी

शेतकरी असावा तर असा! करतो मोत्यांची आणि चंदनाची शेती व सोबतीला आहे शेळीपालनाची साथ,लाखो रुपये कमवतो वर्षाला

Published by
Ajay Patil

शेतीमध्ये एकाच प्रकारची शेती न करता त्यामध्ये जर विविधता आणली तर शेती नक्कीच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध करू शकते. तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची लागवड तसेच काही शेतीशी संबंधित असलेले व्यवसाय आणि शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करून जर नियोजन केले तर शेतीमधून आर्थिक प्रगती साधने अवघड नाही.

त्यामुळे आता बरेच शेतकरी शेती करत असताना पशुपालन किंवा शेळी पालन सारखे व्यवसाय करतात. परंतु त्याही पुढे जात आता नवनवीन प्रकारच्या कल्पना शेतीमध्ये राबवून शेती मधून लाखो रुपये उत्पन्न साधण्याची किमया बऱ्याच शेतकऱ्यांनी साध्य केली आहे. अगदी याचप्रमाणे जर आपण गडचिरोली जिल्ह्यातील पारडी येथील तरुण शेतकरी संजय गंडाटे यांची यशोगाथा पाहिली तर ती नक्कीच प्रेरणादायी आहे.

साधारणपणे बारा वर्षांपूर्वी त्यांनी गोड्या पाण्यामध्ये शिंपल्यात मोती संवर्धन सुरू केले व मोत्यांची शेती सुरू केली.आज या शेतीचा त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास व विस्तार केला असून अंगणामध्ये विटा सिमेंटचा वापर करून टाक्या उभारल्या व त्यामध्ये 3200 शिंपल्यात मोत्यांचे संवर्धन सुरू केले आहे

व येणाऱ्या पुढच्या वर्षांमध्ये त्यांना यापासून मोत्यांचे उत्पादन मिळेल. याशिवाय ते शेळी पालन देखील करतात व फळबागा तसेच चंदन व सागवानाची देखील लागवड केलेली असून या शेतीच्या विविधतेतून त्यांनी आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणावर मिळवले आहे.

 कशी आहे संजय गंडाटे यांची मोत्यांची शेती?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्ह्यातील पारडी या गावचे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे संजय गंडाटे यांनी साधारणपणे 12 वर्षांपूर्वी गोड्या पाण्यात शिंपल्यात मोती संवर्धन करून मोत्यांची शेती सुरू केली व आज त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

अंगणामध्ये त्यांनी विटा व सिमेंटच्या टाक्या उभारल्या व त्यात 3200 शिंपल्यात मोती संवर्धन सुरू केले असून पुढील वर्षभरात त्यांना या माध्यमातून चांगले उत्पादन मिळेल. संजय यांचे बीए एलएलबी पर्यंत शिक्षण झाले असून ते उच्चशिक्षित आहेत.

परंतु शेती व शेती संबंधित काहीतरी वेगळे करावे या उद्देशातून बारा वर्षांपूर्वी त्यांनी गोड्या पाण्यात मोती संवर्धन सुरू केले. सुरुवातीला त्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेततळ्यामध्ये हा प्रयोग केला परंतु तो फसला. परंतु अपयशी झाल्यानंतर निराश न होता त्यांनी घरीच सुरुवातीला दहा बाय पंधरा फूट लांबी रुंदी व सात फुट खोल सिमेंट टाकी निर्माण केली व यामध्ये मोती संवर्धन सुरू केले.

तेव्हापासून त्यांनी मात्र मागे वळून पाहिले नाही व आर्थिक  समृद्धी या माध्यमातून मिळवली. त्यानंतर एका व्यक्तीकडून जागा खरेदी केली व 16 बाय 16, पंधरा बाय अकरा लांबी रुंदी व 15 ft खोलीचे सिमेंट टाक्या तयार केल्या व या तिन्ही टाक्यांमध्ये आता ते मोती संवर्धन करत आहेत.

 कसे मिळते मोत्यांचे उत्पादन?

यामध्ये विशिष्ट आकाराचा मिश्र धातूपासून   बनवलेला स्थायू पदार्थ जिवंत शिंपल्यांमध्ये सोडला जातो व यावर शिंपले नैसर्गिकरीत्या चिकटस्त्राव सोडतात. या प्रक्रिये करता 18 ते 24 महिन्याचा कालावधी लागतो.

या कालावधीत मोती पूर्णतः परिपक्व होतो. ज्याप्रमाणे मिश्र धातूला आकार दिलेला असतो त्यानुसार त्याची घडण होत असते. तसेच शिंपल्यांना खाद्य म्हणून महिन्यातून एकदा शेण गोवऱ्या यांचा अर्क दिला जातो.

मोत्यांच्या शेतीला आहे शेळीपालनाची जोड

मोत्यांच्या शेती सोबतच संजय गंडाटे  यांच्याकडे लहान मोठे अशा एकूण 40 शेळ्या असून त्यांच्यासाठी त्यांनी एक छोटेसे शेड देखील उभारले आहे. शेळींची सगळी जबाबदारी संजय यांचे वडील सांभाळतात व या माध्यमातून देखील त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते.

 एका एकरामध्ये आहे चंदनाची शेती

संजय यांनी पावणेदोन एकर क्षेत्रातील  एक एकर वर चंदनाची 740 झाडांची साडेतीन वर्षांपूर्वी लागवड केलेली आहे व या जागेवरच ८० झाडे चीकुची तसेच तीस झाडे लिंबू, डाळिंबाची 30 तसेच सीताफळाची तीस व पपईची वीस झाडांची लागवड केलेली आहे.

तसेच शेताच्या सभोवताली निलगिरीची शंभर झाडे देखील लावले असून आता या हे सगळी झाडे जोमाने वाढलेली आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या वडिलोपार्जित्व संयुक्त मालकीच्या अडीच एकरामध्ये सागाची 2200 झाडे देखील त्यांनी लावले असून त्यासोबत बांबूची 440 म्हणजे देखील लागवड केलेली आहे. या सगळ्या शेती नियोजनातून ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत.

Ajay Patil