कृषी

संगमनेर राहुरीत द्राक्षे, पेरू, डाळिंबाचे मोठे नुकसान, नेवासा, कोपरगाव राहत्यात कांदा, ज्वारी, हरभरा उद्ध्वस्त

Published by
Ahmednagarlive24 Office

 Agricultural News : महाराष्ट्राबरोबर उत्तर नगरमध्येही अवकाळी पाऊस जोरदार कोसळला आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस झालेल्या पाऊस व गारपीटीने अकोल्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले.

राहुरी, संगमनेरमधील द्राक्षे, पेरू, डाळिंब या फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. नेवासा, कोपरगाव व राहात्याच्या काही भागांतील लाल कांदा, ज्वारी, हरभरा पिकेही अवकाळीने उद्ध्वस्त केली. त्यामुळे शेतमालाच्या नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात अवकाळी पाऊस पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खंडाळा येथे बैलाच्या अंगावर वीजवाहक तारा पडल्याने बैल मरण पावला, तर रामपूर, नाऊर परिसरात काही घरांची पडझड झाली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर, उक्कलगाव, पढेगाव, मालुंजा, मातापूर, कारेगाव, वांगी, खिर्डी, गुजरवाडी, टाकळीभान, खोकर, भोकर, वडाळा महादेव, टाकळीभानसह तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारे व विजांच्या कडकडाटात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला.

या पावसामुळे शेतात नुकत्याच लागवड केलेल्या कांद्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्न कांदा रोप मरीचे प्रमाणात वाढणार आहे. अनेक ठिकाणी चारा पीक भुईसपाट झाले. शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी,

अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करणार असल्याचे आमदार लहू कानडे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office