कृषी

Agriculture News : शेतकऱ्याने जगायचं तरी कसे ? एकरी ६० हजार रुपये खर्च केलेल्या पिकातून काहीच नाही मिळाले…

Published by
Ahmednagarlive24 Office

Agriculture News : सध्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेणं अवघड होत चालले आहे. कुठे पाऊस तर कुठे कडक उन पडत आहे. त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत.

त्यामुळे चांगला बाजार भाव असून देखील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. शेतकरी रामदास थोरात यांनी आपल्या घरा शेजारील एक एकरमध्ये फ्लॉवर या तरकारी पिकाची लागवड केली होती. मात्र फ्लॉवर या पिकावरती पडलेल्या घाण्या या रोगाच्या प्रादुर्भावामुळे रोटर फिरवला आहे.

सध्या फ्लॉवर या पिकाला १० किलो साठी २०० ते २५० रुपये बाजार भाव आहे. त्यांनी त्यांच्या शेतातील फ्लावरच्या दहा पिशव्या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले असता त्या ठिकाणी असणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्या पिकावरती घाण्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यामधील तो माल खरेदी करण्यास नकार दिला.

त्यामुळे थोरात यांनी घरी आल्यानंतर संपूर्ण एक एकर क्षेत्रात असलेल्या फ्लॉवर या पिकावर जड अंतःकरणाने रोटर फिरवला. यासाठी त्यांनी एकरी ६० हजार रुपये खर्च केला होता. आपला खर्च निघून दोन पैसे हातात राहतील असा विश्वास त्यांना होता.

मात्र दोन ते तीन दिवसांपूर्वी पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे तोडणीला आलेल्या फ्लावरच्या पिकाला घाण्या या रोगाचा प्रादुर्भाव झाला व त्यांना या निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आहे.

Ahmednagarlive24 Office