शेती असावी तर अशी!! गाय पालन, मधमाशी पालन अन मिश्रशेती करून ‘हा’ अवलिया करतोय 30 लाखांची जंगी कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi news : भारतातील शेतकरी बांधव (Farmers) शेती व्यवसायात चांगले उपक्रम (Farming) राबवून नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. शेतकरी काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करतात आणि चांगली बक्कळ कमाई करत असतात.

राजस्थानमध्ये (Rajsthan) देखील एका शेतकरी बांधवाने शेती व शेतीपूरक व्यवसायातून (Agriculture Business) यशाचे दरवाजे उघडले आहेत. या अवलिया शेतकऱ्याने गाय पालन, (Cow Rearing) मधमाशी पालन (Beekiping) व एकात्मिक शेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे.

यामुळे राजस्थानच्या या भुमिपुत्राचा शेतीमधील हा उपक्रम राजस्थान समवेतच संपूर्ण देशात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. एकात्मिक शेतीचे हे उदाहरण राजस्थानची राजधानी जयपूरपासून 60 किमी अंतरावर असलेल्या भैराणा गावात पाहायला मिळत आहे.

येथील 80 बिघा शेतात एकात्मिक शेती करताना शेतकरी सुरेंद्र सिंग अवाना यांनी देशातील सर्वोत्तम गिर जातीच्या 200 गायी पाळल्या आहेत. त्यांच्या शेतात अग्रभागी वृक्षारोपण, सेंद्रिय शेती, शेणखतापासून दिवे तयार करणे, शेणखत, कुंड्या आणि विटा, सेंद्रिय खत कारखाना, मत्स्यपालन, मेंढ्या-शेळीपालन आदी व्यवसाय आहेत.

सुरेंद्र यांनी आपल्या शेतात दीड दशकात नवनवीन प्रयोग करून राज्यातील सर्वात मोठे प्रजनन केंद्र बनवले आहे, जिथे फक्त पायडांची पैदास केली जाते. शेतातच पशुखाद्य बनवण्याचा छोटा कारखाना उभारला आहे. आता सुरेंद्र यांचे हे शेतीचे मॉडेल पाहण्यासाठी दक्षिण भारतातील राज्यांमधूनही शेतकरी पोहोचू लागले आहेत.

सुरेंद्र गायीचे दूध 80 रुपये आणि देशी तूप 2,000 रुपये किलो दराने विकत आहे. एवढेच नाही तर रसगुल्ला आणि माव्यापासून बनवलेले मिठाई देखील येथे बनवली जात असून बाजारात विकली जात आहे. दररोज मागणीनुसार भाजीपाला आणि धान्य थेट ग्राहकांच्या दारात पोहोचत आहे.

उत्पादनांची विक्री केली जात नाही, तर थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोचवले जाते: सफरचंद, स्ट्रॉबेरी, मनुका, पेरू आणि पीच या फळझाडांचीही सुरेंद्र यांनी लागवड केली आहे. सुरेंद्र यांनी सांगितले की, त्यांच्या शेतातून 400 कुटुंबांना रोजाना फळे, भाजीपाला, धान्य, दूध आणि तूप नियमितपणे पुरवले जात आहे.

गहू, बाजरी, मका बाजारात न विकता तो थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवला जातं आहे. एवढेच नाही तर सुरेंद्र यांनी शेतात 30 लोकांना रोजगार देखील दिला आहे. त्यांच्या शेतात वर्षभरात 22 प्रकारचा चारा तयार केला जातो. शेतात 150 प्रकारच्या औषधी वनस्पतींची देखील लागवड करण्यात आहे. रोपवाटिकेत विविध प्रकारची रोपे लावली जातात.

वर्षाला 30 लाखांची जंगी कमाई
सुरेंद्र यांचा दावा आहे की तो, सध्या वार्षिक 30 लाख रुपये कमवत आहे. हंगामानुसार भाजीपाला व धान्याचे उत्पादन घेतले जाते. ते म्हणाले की, 2016 मध्ये दोन गीर गायींनी डेअरी फार्म सुरू केला, सध्या 200 गायी असून अजून तीन वर्षानंतर ही संख्या 400 वर पोहोचेल.

दोन वर्षांत येथे 60 बछड्यांचा जन्म झाला आहे. शेणखतापासून नैसर्गिक पोषक तत्त्वे शेतात मिसळून सेंद्रिय खत तयार केले जाते. खत तयार करण्याचा हा छोटा कारखाना शेतीतच सुरु केला आहे. शेणखत आणि शेणापासून बनवलेल्या वस्तू बाजारात विकल्या जातात. सुरेंद्र गेल्या दशकापासून दररोज एक झाड लावत आहे. शेत पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांनाही तो झाडे लावायला लावतो.

पुरस्काराने सुरेंद्र झालेत सन्मानित:
सुरेंद्र यांना गेल्या वर्षी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडून राष्ट्रीय गो पालन रत्न पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळालेले ते राजस्थानमधील पहिलेचं शेतकरी आहेत. याशिवाय भारतीय कृषी संशोधन परिषदेने त्यांना हलधर सेंद्रिय पुरस्काराने सन्मानित केले आहे. राज्य सरकार, कृषी विद्यापीठ जॉबनेर यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे.