कृषी

Intercropping: उसामध्ये घ्या ‘ही’ आंतरपिके आणि 3 महिन्यात कमवा लाखो रुपये! ऊस पिकाला देखील होईल फायदा

Published by
Ajay Patil

Intercropping:- बरेच शेतकरी महाराष्ट्रामध्ये मुख्य पिकासोबत वेगवेगळ्या प्रकारची आंतरपिके घेत असतात. यानंतर पिकांमुळे मुख्य पिकाचा जो काही उत्पादन खर्च होतो तो तर निघतोच परंतु तो खर्च निघून बऱ्याचदा शेतकऱ्यांना आर्थिक नफा देखील राहून जातो.

तसेच बरेच शेतकरी कपाशी सारख्या पिकांमध्ये उडीद, मुगासारख्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करतात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच परंतु जमिनीला अनेक प्रकारचे पोषक घटक देखील या पिकांच्या माध्यमातून मिळत असल्यामुळे जमिनीमध्ये आवश्यक पोषक घटकांची वाढ झाल्याने मुख्य पिकाला देखील त्याचा फायदा होत असतो.

अगदी याच पद्धतीने जर आपण ऊस या पिकाचा विचार केला तर हे दीर्घ कालावधीचे पीक असल्यामुळे उसात साडेतीन ते चार महिन्यापर्यंत काढणीला तयार होईल अशा प्रकारची आंतरपिके घेता येतात. यामध्ये पूर्व हंगामी व सुरू हंगामात रुंद सरी पद्धतीने लावलेला ऊस असेल तर त्यामध्ये शेतकऱ्यांना आंतरपीक घेता येऊ शकते.

उसामध्ये जर आंतरपीक घेतले तर उसाच्या लागवडीपासून चार महिन्यापर्यंत आंतरमशागत वाचते व यावर होणारा खर्च देखील वाचण्यास मदत होते. एवढेच नाही तर या आंतर पिकांमुळे शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पादन देखील मिळू शकते.

 उसामध्ये आंतरपिके घेतल्याने होतो फायदा

 ऊस पिकामध्ये आंतरपीक घेतल्याने साडेतीन ते चार महिन्यापर्यंत ऊस पिकाचे अंतर मशागत वाचून त्यावरील खर्च देखील वाचतो.शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक उत्पन्न आणि उत्पादन देखील मिळू शकते. उसामध्ये जर आंतर पिकांचे नियोजन करायचे असेल तर त्याकरिता पाच फुट अंतर असलेल्या सरीच्या पट्ट्यामध्ये कमी उंच वाढणारी आणि तीन ते चार महिन्यात काढणीला येऊ शकतील अशी आंतरपिके घेता येणे शक्य आहे.

या पिकांची काढणी तीन ते चार महिन्यांमध्ये झाल्यानंतर ऊस पिकासाठी बेवड देखील चांगली होते व ऊस वाढीला फायदा देखील होतो. जर उसाचा विचार केला तर हे बहुवार्षिक पीक असल्यामुळे त्याच्या वाढीसाठी वेळ लागतो व त्याचबरोबर त्याच्या दोन सऱ्यांमध्ये चार ते पाच फूट जागा रिकामी असते.

त्यामुळे जर या जागेत आंतरपीक घेतले तर  या पिकांच्या काढणीनंतर ऊस पिकाला बेवड म्हणून ते फायद्याचे ठरते. समजा तुम्ही यामध्ये जर हरभरा पिक घेतले तर त्यावरील आम्ल असल्यामुळे ऊसाला त्याचा फायदा होतो. समजा तुम्ही अंतर पीक घेतले आहे

व त्यापासून तुम्हाला चांगले आर्थिक उत्पन्न जरी मिळाले नाही तरी ते  उसाच्या सरीमध्ये दाबून त्यापासून उत्तम पद्धतीचे सेंद्रिय खत जमिनीला उपलब्ध होऊ शकते. तसेच तुम्ही जर आंतरपीक म्हणून हिरवळीचे एखादे पीक घेतले असेल तर असे पीक सरीत दाबून त्यापासून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते.

 उसामध्ये कोणती अंतर पिके घेणे शक्य आहे?

 सुरू किंवा पूर्व हंगामी उसामध्ये जर आंतरपीक घेण्याची प्लॅनिंग असेल तर तुम्ही यामध्ये कोबी, हरभरा, कांदा, गहू, भुईमूग तसेच बीट यासारखे पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करू शकतात. बरेच ठिकाणी शेतकरी मक्यासारखे पीक देखील उसामध्ये आंतरपीक म्हणून घेत असतात. कारण कांदा तसेच पालेभाज्या,

भुईमूग  तसेच हरभरा यासारखी आंतरपिके  प्रामुख्याने तीन ते चार महिन्यांमध्ये काढणीला येतात. या तीन ते चार महिन्याच्या कालावधीत या पिकांपासून शेतकऱ्यांना क्षेत्रानुसार 50000 पासून ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते. दुसरे म्हणजे या तीन महिन्यांमध्ये आंतर पिकांचे काढणी झाल्यानंतर ऊस पिकाचे पुढे नियोजन उत्तम पद्धतीने करता येणे शक्य असते.

Ajay Patil