कृषी

भेंडी लागवडीतून कमवायचा भरपूर पैसा तर करा ‘या’ वाणांची लागवड! कमी कालावधीत मिळेल भरपूर पैसा

Published by
Ajay Patil

Okra Crop Variety:- भाजीपाला पिकांची लागवड ही शेतकऱ्यांसाठी अनेक अर्थाने फायदेशीर ठरते. यातील पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे जर आपण भाजीपाला लागवड केली तर कमी कालावधीमध्ये तुम्हाला उत्पादन मिळायला सुरुवात होते व पैसा देखील यायला लागतो.

दुसरे म्हणजे भाजीपाला लागवड जर केली तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये कायम पैसा खेळता राहू शकतो. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये आता भाजीपाला लागवड खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येत आहे व यामध्ये मिरची, टोमॅटो, वांगे तसेच भेंडी व वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काकडी तसेच गिलके व कारले,

दोडक्यासारखा पिकांची लागवड केली जाते. या भाजीपाला पिकांमध्ये जर आपण भेंडी या पिकाचा विचार केला तर भेंडीला बाजारपेठेमध्ये कायमच चांगला दर दिसून येतो.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून भेंडीचे फायदे असल्याने वर्षभर आपल्याला मागणी देखील दिसते. त्यामुळे भेंडी लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे ठरते व महाराष्ट्रमध्ये जळगाव तसेच धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये भेंडी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे तुम्हाला देखील जर भेंडी लागवड करायची असेल तर या लेखामध्ये आपण भेंडीच्या काही चांगल्या उत्पादन देणाऱ्या वानांची माहिती थोडक्यात घेऊ.

हे आहेत भेंडीचे चांगले उत्पादन देणारे वाण

1- पुसा सावनी- भेंडीची ही सुधारित जात चांगली उत्पादनक्षम असून याची लागवड उन्हाळ्यात तसेच हिवाळा आणि पावसाळ्यात देखील करता येऊ शकते. भेंडीचा हा वाण दर्जेदार आणि चांगला उत्पादनक्षम असून पावसाळ्यामध्ये लागवडीनंतर साधारणपणे 60 ते 65 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो. त्यामुळे कमी कालावधीत उत्पादन मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा वाण फायद्याचा आहे.

2- परभणी क्रांती- भेंडीची ही जात खूप महत्त्वाची असून लागवडीनंतर साधारणपणे 50 दिवसात काढणीस तयार होते व कमी वेळेत शेतकऱ्यांना पैसा मिळणे शक्य आहे.

या जातीच्या भेंडीचा रंग गडद हिरवा असतो आणि तिची लांबी साधारणपणे 15 ते 18 सेंटीमीटर इतके असते. दर्जेदार उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून भेंडीची ही जात फायद्याची आहे.

3-अर्का अभय- भेंडीची ही जात पिवळ्या मोझॅक सारख्या गंभीर अशा विषाणू रोगाशी लढण्यास सक्षम आहे व त्यामुळे ही जात फायद्याची ठरू शकते. अर्का अभय जातीची भेंडीचे झाड 120 ते 150 cm उंच आणि सरळ वाढते. तसेच लागवड केल्यानंतर कमी दिवसांमध्ये चांगले उत्पादन देते.

4- पंजाब पद्मिनी- भेंडीची ही जात पंजाब विद्यापीठाने विकसित केली असून या प्रकारची भेंडी सरळ आणि गुळगुळीत असते. या जातीची भेंडी ही गडद हिरव्या रंगाची असते. तसेच या जातीपासून भरपूर आणि दर्जेदार असे भेंडीचे उत्पादन मिळते.

5- अर्का अनामिका वाण- भेंडीची ही जात येलो मोझॅक विषाणू रोगाशी लढण्यास सक्षम असून या जातीची भेंडी ही केसाळ नसते व अतिशय मऊ असते.

भेंडीची ही जात उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये लागवडीसाठी फायद्याची असून चांगले उत्पादन देण्यास सक्षम आहे. उन्हाळा व पावसाळ्यात जर लागवड केली तर चांगले उत्पादन देण्यास सक्षम आहे.

Ajay Patil