कृषी

Onion News : सरकारची ही घोषणा, बनवाबनवी आहे का ?सरकारने नाफेडची फक्त घोषणा केली…

Published by
Ahmednagarlive24 Office

Onion News : नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू होऊन कांद्याचा निर्माण झालेला तिढा लवकर सोडावा, अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील क्रांती शेतकरी संघटनेचे सचिन उगले यांनी केली आहे.

केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्यानंतर निर्माण झालेली कांद्यावरील कोंडी फोडण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून नाफेडमार्फत कांदा खरेदी तत्काळ सुरू करण्यात येईल,

असे सरकाडून जाहीर करूनही अद्याप ही नाफेड खरेदीसाठी बाजार समितीत न उतरल्याने सरकारची ही घोषणा, बनवाबनवी आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कांदा व्यापाऱ्यांनी १५०० रूपये क्विंटल ने खरेदी केला जात आहे.

सरकारने नाफेडची फक्त घोषणा केली असली तरी बाजार समितीमध्ये नाफेडचे कुठलेही अधिकारी फिरकत नाहीत. नाफेड कांदा खरेदीसाठी प्रत्यक्षात उतरते की नाही, याबाबत मोठी साशंकता निर्माण झाली आहे.

नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू होऊन कांद्याचा निर्माण झालेला तिढा लवकर सुटावा, अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील क्रांती शेतकरी संघटनेचे सचिन उगले यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office