Jawas Lagwad : मित्रांनो देशात आता रबी हंगामाला (Rabi Season) सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधव (Farmer) गहू, जवस, हरभरा यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) करणार आहेत. खरं पाहता गहू हे रबी हंगामात (Rabi Season) सर्वाधिक उत्पादित केले जाणारे एक नगदी पीक आहे.
मात्र जवस (Linseed Crop) देखील रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाणारे पीक आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की जवसची कोरडवाहू भागात आणि बागायती भागात ते तेल पेरणी करता येणे शक्य आहे.
दरम्यान कोरडवाहू भागात पेरणी करण्यासाठी उपयुक्त वेळ ऑक्टोबर महिन्यातील पहिला आठवडा असतो. मात्र बागायती भागात दुसर्या आणि तिसर्या आठवड्यात देखील जवसची पेरणी केली जाते.
अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी जवसच्या काही सुधारित जातींची (Linseed Variety) माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
जवसच्या सुधारित जाती खालीलप्रमाणे :-
लातूर जवस-93 – मित्रांनो जवसची ही एक सुधारित जात आहे. या जातीची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, हे लवकर तयार होणारे वाण आहे. या जातीच सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे वाण कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे.
एन.एल.-97 – हे वाण देखील जवसच्या सुधारित जातींपैकी एक आहे. जाणकार लोकांच्या मते हे वान पेरणी केल्यानंतर 115 ते 120 दिवसात उत्पादन देण्यासाठी तयार होते. या जातीपासून उत्पादित होणाऱ्या जवस मध्ये तेलाचे प्रमाण 42 टक्के असते. निश्चितच तेलाचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांसाठी या जातीची लागवड फायदेशीर ठरणार आहे.
एन. एल.- 260 :- जवसची ही जात देखील सुधारित जात म्हणून ओळखली जाते. मित्रानो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीची पेरणी केली म्हणजे 111 ते 115 दिवसात या जातीपासून उत्पादन मिळत असते. निश्चितच ही अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणारी जात आहे. यामुळे या जातीची लागवड देखील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.