Lemon Farming Business: लिंबू लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या लिंबाचा दर आकाशाला गवसणी घालत आहेत. यावर्षी तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने लिंबू च्या मागणीत वाढ झाली आणि परिणामी दरात देखील मोठी वाढ झाली आहे.

यामुळे शेतकरी बांधव (Farmers) सध्या लिंबू लागवड करण्याचा विचार करीत आहेत. आपल्या राज्यात (Maharashtra Farmers) मोठ्या प्रमाणात लिंबाची लागवड केली जात असते असे असले तरी दरवर्षी उन्हाळ्यात लिंबाला चांगले दर मिळत असतात.

यामुळे लिंबाची शेती (Lemon Farming) शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे, अनेक शेतकरी बांधव लिंबू लागवड (Lemon Cultivation) करून लाखोंचा नफा कमवत आहेत आज आपण लिंबू लागवड विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी. लिंबूचे झाड एकदा लावले की त्यापासून 10 वर्षे उत्पादन घेतले जाऊ शकते.

कृषी तज्ञांच्या मते, लिंबूचे झाड सुमारे 3 वर्षांनी चांगले वाढते. त्याची झाडे वर्षभर उत्पन्न देत राहतात. भारत हा जगातील सर्वात मोठा लिंबू उत्पादक देश (Lemon producing countries) आहे.

आपल्या देशात तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यांमध्ये लिंबाची लागवड केली जाते.

याचाच अर्थ याची लागवड संपूर्ण देशात केली जाऊ शकते. भारतीय हवामान लिंबाच्या शेतीसाठी अनुकुल असल्याचा कृषी तज्ञ यांचा दावा आहे.

शेतकरी बांधव वेगवेगळ्या राज्यांमध्ये लिंबाच्या विविध जातींची लागवड करतात. देशातील अनेक शेतकरी बांधव लिंबाची लागवड करून भरघोस नफा कमवत आहेत.

लिंबूच्या शेतीसाठी उपयुक्त जमीन लिंबूची लागवड वालुकामय, चिकणमाती असलेल्या जमिनीत करण्याचा सल्ला दिला जात असतो. याशिवाय लाल लॅटराइट जमिनीतही लिंबू लागवड केली जाऊ शकते. आम्लयुक्त किंवा अल्कधर्मी जमिनीतही लिंबाची लागवड करता येणे शक्य असल्याचा कृषी तज्ञ (agricultural specialist) यांचा दावा आहे.

लिंबाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे लिंबाची लागवड डोंगराळ भागात देखील केली जाऊ शकते आणि यापासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले जाऊ शकते. मात्र, लिंबूच्या झाडाला थंड आणि दंव अर्थात दड पासून संरक्षण देणे आवश्यक असते. 4 ते 9 यादरम्यान pH मूल्य असलेल्या जमिनीत लिंबाची लागवड करता येणे सहज शक्य आहे.

लिंबूची लागवड शेतकरी मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, लिंबाच्या बिया देखील पेरल्या जाऊ शकतात. लिंबाची रोपेही लावता येतात. लिंबाची लागवड रोपे लावून केली जात असते आणि याचं पद्धतीने चांगली होते आणि त्यासाठी मेहनतही कमी लागते.

त्याच वेळी, बियाणे पेरणी करून लिंबू लागवड केली तर लिंबूचे रोप उगवण्यास अधिक काळ लागतो आणि मेहनत देखील अधिक घ्यावी लागते. शेतकरी मित्रांनो आपण लिंबू रोपे रोपवाटिका मधून खरेदी करु शकता. खरेदी केलेली रोपे एक महिना जुनी आणि चांगली असावीत याची मात्र काळजी घ्यावी.

एका एकरात 5 लाखांची कमाई लिंबाची शेती खुपच फायदेशीर असते. लिंबाच्या एका झाडाला सुमारे 30-40 किलो लिंबू लागतात. याशिवाय, जाड साल असलेल्या लिंबाचे उत्पादन 40 ते 50 किलो पर्यंत असू शकते. बाजारात लिंबाची मागणी वर्षभर सारखीच असते. लिंबाचा बाजारभाव 40 ते 70 रुपये किलोपर्यंत आहे. यानुसार एक एकर लिंबाची लागवड करून शेतकरी सुमारे 4 ते 5 लाख रुपये सहज कमवू शकतो. यामध्ये बाजारपेठेतील दरानुसार आणि मागणीनुसार कमी जास्त होऊ शकते.