कृषी

Maharashtra Breaking : ब्रेकिंग ! आता शेतकऱ्यांना बाजार समितीची निवडणूक लढवता येणार ; मंत्रीमंडळ बैठकीत झाला हा मोठा निर्णय

Published by
Ajay Patil

Maharashtra Breaking : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काल गुरुवारी झालेल्या एका मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांसंदर्भात अजून एक मोठा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता शेतकरी बांधवांना बाजार समितीची निवडणूक लढवता येणार आहे. म्हणजेच आता बाजार समिती प्रशासनामध्ये थेट शेतकरी सहभागी होणार आहेत.

यामुळे बाजार समिती प्रशासनाच्या कामकाजात शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व राखले जाणार आहे. शेतकरी बांधवांचा बाजार समितीच्या कामकाजात व प्रशासनात सहभाग वाढल्यास शेतकरी हिताचे निर्णय बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत. तसेच शेतकरी बांधवांना येत असलेल्या अडचणी खुद्द शेतकरीच बाजार समिती प्रशासनामध्ये निवडून गेले असल्याने दूर होतील असे देखील जाणकार लोक नमूद करत आहेत.

एकंदरीत आता बाजार समिती प्रशासनामध्ये शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे. शेतकरी बांधवांना बाजार समितीची निवडणूक लढवता येणे शक्य व्हावी अनुषंगाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा केली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. यासंदर्भातील निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना आता निवडणूक लढवता येणार आहे. यासाठी कायद्यात धोरणात्मक बदल केले जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाने काल मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र कृषी पणन अधिनियमात धोरणात्मक बदल होणार आहेत. या सुधारणेमुळे कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या व्यवस्थापन समितीवरील निर्वाचित सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबतच आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवता येणे शक्य होणार आहे.

या निर्णयामुळे बाजार समिती प्रशासनामध्ये शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप राहणार आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये ज्या अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा अडचणी बाजार समिती प्रशासनामध्ये उपस्थित केल्या जाणार आहेत.

Ajay Patil