Maharashtra Dam Storage : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात कमालीची दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
कमी पावसामुळे पावसाळी काळात राज्यातील बरीच धरणे पूर्ण क्षमतेने भरले नाही. यामुळे ऐन हिवाळ्यातच आता राज्यातील काही धरणांनी तळ गाठला आहे. येत्या काही दिवसात फेब्रुवारी महिना संपणार अन मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे.
अर्थातच मान्सूनसाठी आणखी साडे तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा महाराष्ट्राला चांगलाच त्रास देणार हे स्पष्ट होत आहे. पाण्याची भीषण टंचाई यामुळे यंदाचा उन्हाळा विशेष कष्टदायक राहील असे चित्र आता तयार होत आहे.
कारण की, महाराष्ट्रातील जायकवाडी समवेतच अनेक महत्त्वाच्या धरणांमधील पाणीसाठा खूपच कमी झाला आहे. मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून जायकवाडी धरणाची ओळख आहे मात्र जायकवाडी धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाला असून यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.
एकंदरीत आगामी काळात मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान आता आपण राज्यातील धरणांमध्ये किती पाण्याचा साठा उपलब्ध आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या धरणात किती पाणी उपलब्ध आहे
औरंगाबाद विभागातील जायकवाडी धरणात 28.34, येलदरी मध्ये 41.55, सिद्धेश्वर 83.41, नागझरी 29.89, लोअर दुधना 12.90 टक्के एवढा पाण्याचा साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे विभागातील धरणाबाबत बोलायचं झालं तर विभागातील खडकवासला 56.82, टेमघर 10.59, मुळशी 61.89, कोयना 61.41, उजनी 0.00 टक्के एवढा पाणी साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक विभागातील भंडारदरा 46.91, गंगापूर 60.49, गिरणा 33.24, दारणा 42.97, चणकापूर 26.35 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
नागपूर विभागातील धरणातील पाण्याच्या साठ्याबाबत बोलायचं झालं तर येथील गोसीखुर्द प्रकल्प 51.76, कामठी खैरी 49.81, तोतलाडोह 63.50, लोअर वर्धा 64.95 टक्के एवढा पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे.
अमरावती विभागातील काटेपूर्णा 33.72, अप्पर वर्धा 61.35, नळगंगा 35.39, बेंबळा धरणात 39.25 टक्के एवढा पाण्याचा साठा उपलब्ध आहे. कोकणातील मध्य वैतरणा 13.20, मोडकसागर 52.74, तानसा 61.83, भातसा 57.61, घाटघर धरणात 60.70 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध असल्याची आकडेवारी समोर आली आहे.