महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये अगोदर नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर व्हायची.परंतु आता अनेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये कांदा लागवड वाढू लागलेली आहे. विशेष म्हणजे बऱ्याचदा कांद्याचे भाव घसरलेले असतात
परंतु तरी देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे कांदा लागवडीकरिता दर्जेदार व जातिवंत बियाणे उपलब्ध व्हावे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. कारण बियाणे जर दर्जेदार असेल तर त्यापासून मिळणारे उत्पादन देखील दर्जेदार व भरघोस मिळते.
याकरिता शेतकऱ्यांना चांगले बियाणे लागवडीसाठी उपलब्ध व्हावे याकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक पाऊल पुढे उचलत स्वतः विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले समर्थ आणि बसवंत 780 या शेतकऱ्यांच्या पसंतीच्या वानांची विक्री 21 मे 2024 पासून केली जाणार आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कांदा बियाण्याची होणार विक्री
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून जे काही कांदा बियाणे विकसित करण्यात आलेले आहे त्यामध्ये फुले समर्थ व बसवंत ७८० या कांद्याच्या वाणांना शेतकऱ्यांमध्ये चांगली पसंती दिसून येते. त्यामुळे आता या वानांची विक्री 21 मे 2024 पासून केली जाणार आहे. कांदा बियाण्याची विक्री महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी करण्यात येणार असून प्रत्येक वर्षी या वानांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी असते.
शेतकऱ्यांना कुठे उपलब्ध होईल हे बियाणे?
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नाशिक, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील कृषी विद्यापीठातील मध्यवर्ती परिसरामध्ये या कांदा बियाण्याची विक्रीची सोय उपलब्ध करून दिली असून यामध्ये….
1- कृषी संशोधन केंद्र, निफाड( नासिक )
2-कांदा, लसुन व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत( नासिक)
3- कृषी संशोधन केंद्र, चास( अहमदनगर)
4- कृषी संशोधन केंद्र बोरगाव( सातारा)
5- कृषी महाविद्यालय मालेगाव( नाशिक)
6- कृषी संशोधन केंद्र लखमापूर( नासिक)
7-
कृषी विज्ञान केंद्र, धुळे8- कृषी महाविद्यालय पुणे
9-कृषी महाविद्यालय, हाळगाव तालुका जामखेड ( अहमदनगर)
या ठिकाणी कांद्याच्या या वाणाची विक्री केली जाणार आहे.
किती राहिल या बियाण्याचा दर?
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विक्री केली जाणाऱ्या या बियाण्याचा दर प्रति किलो 1500 रुपये प्रमाणे असणार आहे.