भारतामध्ये आंब्याचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर होते व महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या परिसरात अनेक वेगवेगळ्या व्हरायटीच्या आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यामध्ये जर आपण हापूस आंबा विषयी बघितले तर हापूसला महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात एक मोठी मागणी आणि ओळख आहे.
तसेच या आंब्याची विशिष्ट चव तसेच रंग व सुगंधामुळे हापूसला फळांचा राजा देखील म्हटले जाते. तसेच हापूस आंबा हा एक महागडा आंबा म्हणून ओळखला जातो.
परंतु तुम्हाला माहिती आहे का जगामध्ये हापूस पेक्षा देखील महाग असणारा आंबा असून तो भारतात देखील पिकवला जात आहे. परंतु या आंब्याचे सर्वात जास्त उत्पादन हे सध्या जपान मध्ये घेतले जाते.
मियाझाकी आहे जगातील सर्वात महाग आंबा
मियाझाकी नावाचा हा आंबा जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून प्रसिद्ध आहे. या आंब्याच्या जातीचे उत्पादन जपान मध्ये घेतले जाते व आता भारतातील पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये देखील याचे उत्पादन घेतले जात आहे.
झारखंड राज्यातील जामतारा या ठिकाणी देखील काही प्रमाणात या आंब्याचे उत्पादन आता घेण्यात येत आहे. मियाझाकी हा जगातील सर्वात महाग आंबा असून या आंब्याची किंमत प्रतिकिलो तीन लाख रुपये इतके असल्याचे सांगितले जाते. परंतु तरीदेखील आंब्याचे शौकीन या आंब्यासाठी हवी ती किंमत द्यायला तयार असतात.
काय आहेत मियाझाकी आंब्याची वैशिष्ट्ये?
एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीमध्ये पिकवला जातो व याचा रंग नेहमीच्या पिवळ्या आणि केशरी रंगापेक्षा थोडा वेगळा असतो. हा आंबा वांग्यासारखा दिसतो. कारण या आंब्याचा रंग वांगी किंवा जांभळ्या प्रकाराचा असतो.
जेव्हा आंबा पिकतो तेव्हा त्याचा रंगात बदल होऊन तो लाल रंगाचा होतो. मियाझाकी जातीच्या एका आंब्याचे वजन जवळपास साडेतीनशे ग्रॅम पासून तर 900 ग्रॅम पर्यंत असते.
तसेच या आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असतात व त्यामुळे त्याची किंमत महाग असते असे बोलले जाते. इतर आंब्याच्या तुलनेमध्ये मियाझाकी आंब्यामध्ये 15 टक्क्यांपेक्षा अधिक साखर असते व शिवाय अँटिऑक्सिडेंट गुणधर्माचा देखील यामध्ये समावेश असतो.
त्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. ज्यांची डोळ्यांची दृष्टी कमी असेल अशा लोकांसाठी हा आंबा खूप फायदेशीर मानला जातो.