अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Krushi Marathi:- यंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनातही घट झाली. पण घटलेल्या उत्पादनामुळे आंब्याच्या दरात तेजी येईल असे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होते.
मात्र तसे काही होताना दिसत नसल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. ज्या काळात वाशी मार्केटमध्ये आंब्याचा हंगाम जोमात असतो त्या दरम्यान सध्याच्या हंगामात आंब्याला वाशी मार्केटमध्ये आवक घटली आहे.
तर हवामानातील बदलामुळे हंगामाच्या सुरवातीलाच हे चित्र निर्माण झाले आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या येऊन पोहोचले आहेत.
तर ह्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 29 हजार तर मंगळवारी 24 हजार पेट्यांचीच आवक झाली होती. उत्पादन तर अवकाळा मुळे घटनेचा आहे.
पण घटत्या दराचे काय? अशी चिंता आंबा उत्पादक शेतकऱ्याने समोर निर्माण झाले आहे. तर आंब्याच्या पेटीला सध्या 1 हजार 500 ते 4 हजार 500 असा दर मिळत आहे.
मात्र, हंगामाची सुरवात आणि आता मार्केटमध्ये आंबा दाखल होऊन देखील भाव मात्र वाढत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.
पण ह्या वर्षी आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. केवळ 25 टक्केच उत्पादन पदरी पडेल असे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
बाजारपेठेतील सध्या जरी आवक ही घटली आसली तरी बागायतदारांच्या मते 10 एप्रिलनंतर आंब्याची आवक ही वाढणार आहे.असे उत्पादन संघाकडून सांगण्यात आले आहे.