Medicinal Plant Farming: देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात मोठा बदल करत आहेत. मात्र असे असले तरी अद्याप असे अनेक शेतकरी बांधव आहेत जे पारंपरिक पद्धतीने शेती (Farming) करत आहेत. पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास उत्पन्न खूपच कमी प्राप्त होते.
अशा परिस्थितीत पारंपरिक पिकपद्धतीतून प्राप्त होणारे उत्पन्न आणि उत्पादन खर्च यांचा मेळ काही बसत नाही परिणामी आता अनेक शेतकरी बांधव शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. अनेक शेतकरी बांधव आता आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देऊन नोकरी व उद्योगधंद्यासाठी प्रवृत्त करत आहेत.
मात्र जर काळाच्या ओघात शेतीमध्ये विशेषता पीकपद्धतीत बदल केला तर निश्चितच लाखों रुपयांची कमाई (Farmer Income) केली जाऊ शकते. कृषी तज्ञ देखील शेतकरी बांधवांना पीक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत आहेत. शेतकरी बांधवांनी तर औषधी वनस्पतींची (Medicinal crop) शेती केली तर त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी काही औषधी वनस्पतीच्या शेती (Agriculture) विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत.
हळद – अँटी-ऑक्सिडंट्सच्या गुणधर्माने समृद्ध, हळदीमुळे अनेक प्रकारचे संक्रमण आणि रोग दूर होतात. आयुर्वेदाबरोबरच मसाल्यांच्या जगात हळदीला खूप महत्त्व आहे. चांगला पाऊस असलेल्या भागात पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या चिकणमाती जमिनीत हळदीची लागवड करणे फायदेशीर ठरते. हळदीची व्यावसायिक लागवड करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
कढीपत्ता – कढीपत्ता मसाल्यांव्यतिरिक्त औषधी वनस्पती म्हणून देखील वापरला जातो. वजन कमी करण्यापासून ते पोटाचे आजार आणि संसर्गापर्यंत कढीपत्त्याची भूमिका महत्त्वाची असते. भारतातील बहुतेक घरांमध्ये कढीपत्ता नक्कीच वापरला जातो. बाजारात त्याची वाढती मागणी आणि वापर यामुळे शेतकरी कढीपत्ता म्हणजेच गोड कडुलिंबाची लागवड करून श्रीमंत होऊ शकतात.
पुदिना – पावसाळ्यातील आर्द्रता आणि किंचित उष्ण तापमानात पुदिन्याची लागवड केल्यास चांगले उत्पादन घेता येते. आम्ही तुम्हाला सांगतो की, पुदिन्याचा वापर केवळ खाद्यपदार्थांमध्येच नाही तर तेलाच्या स्वरूपातही केला जातो. मिठाईचे पदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेपरमिंट तेलाला आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मागणी आहे. शेतकर्यांना हवे असल्यास ते पारंपरिक किंवा बागायती पिकांसह बांधावर पुदिन्याची सहपीक करूनही चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
तुळशी – प्रत्येक व्यक्तीस तुळशीचे औषधी गुणधर्म माहीत असतात. आयुर्वेदिक औषधात तसेच धार्मिक दृष्ट्याही त्याचा उपयोग खूप महत्त्वाचा आहे. तसे, बहुतेक घरात तुळशीची लागवड करतात. पण त्याची व्यावसायिक लागवड किंवा औषधी वनस्पती आणि तेलासाठी कंत्राटी शेती हा देखील फायदेशीर व्यवहार ठरणार आहे.