Medicinal Plant Farming: भारतात शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात (Farming) आमूलाग्र बदल घडवून आणत आहेत. शेतकरी प्रामुख्याने पीक पद्धतीत मोठा बदल करत आहेत. आता शेतकरी बांधव नगदी पिकांची (Cash Crops) तसेच औषधी पिकांची (Medicinal Crops) मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत.
यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात (Farmer Income) भरीव वाढ होत असल्याचा दावा केला जात आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक, शेतकरी बांधवांना सल्ला देत नवीन नगदी तसेच बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांची शेती करण्याचे आवाहन करत आहेत. मित्रांनो किनोवा (Quinoa crop) देखील एक प्रमुख नगदी पीक असून याची बाजारात बारामाही मागणी असते.
यामुळे या पिकाची शेती (Quinoa Farming) शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की किनोवा हे एक रब्बी हंगामातील प्रमुख नगदी पीक आहे. ज्याची लागवड ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत केली जाते. हे एक पौष्टिक धान्य देखील आहे, ज्याला प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत देखील म्हटले जाते. यामुळे या पिकाला औषधी पिकांच्या श्रेणीत देखील ठेवले आहे.
शरीरातील चरबी कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे चमत्कारिक औषधी गुणधर्म लक्षात घेऊन, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पौष्टिक तृणधान्यांच्या श्रेणीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. सध्या बाजारात त्याची मागणी वाढत आहे, यामुळे याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर सौदा ठरू शकते.
किनोवा काय आहे
क्विनोआचे वनस्पति नाव चिनोपोडियम क्विनोआ आहे. ही वनस्पती सुरुवातीला हिरवीगार राहते, मात्र नंतर ती गुलाबी होते. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची वर्षातून अनेक वेळा लागवड केली जाते. निश्चितच शेतकऱ्यांसाठी याची शेती चांगले उत्पन्न कमवून देणारी आहे. मात्र असे असले तरी हिवाळ्यात याची लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. यामुळे प्रामुख्याने हिवाळ्यात याची शेती करण्याचा सल्ला दिला जातो. या पिकाच्या लागवडीसाठी, फक्त हलकी वालुकामय किंवा चांगला निचरा असलेली चिकणमाती असलेली जमीन योग्य असते. क्विनोआचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने त्याची लागवड करणे फायदेशीर ठरते.
अशा प्रकारे लागवड करा बरं:-
क्विनोआ लागवडीसाठी जमिनीची चांगली खोल नांगरणी करून समतल बेड तयार केले जातात. शेतातील मातीला पोषण देण्यासाठी भरपूर कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळले जाते. क्विनोआ वाढवण्यासाठी वेगळ्या खतांची गरज नसते आणि पिकामध्ये कीटक व रोग येण्याची शक्यता नसते, परंतु स्टेम बोअरर, ऍफिड्स, लीप हॉपर यांसारख्या किटकांचा प्रादुर्भाव होतो, ज्याला जैविक कीड नियंत्रणाद्वारे रोखता येते.
क्विनोआची पेरणी कशी करणार बरं:-
क्विनोआ लागवडीसाठी हेक्टरी 5 ते 8 क्विंटल बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे उपचार करणे आवश्यक आहे. यासाठी 5 ग्रॅम ऍप्रॉन 35 एस.डी. नावाच्या औषधाने प्रति किलो बियाणे प्रक्रिया केली जाते.
क्विनोआच्या बिया ओळीत पेराव्यात आणि पेरणीनंतर हलके पाणीही द्यावे.
क्विनोआच्या लागवडीसाठी जास्त पाणी लागत नाही, फक्त 2 ते 3 ओलितांमध्ये हे पिकं वाढवून आपण चांगले उत्पादन घेऊ शकता.
यामध्ये पेरणीनंतर लगेचच पहिले पाणी दिले जाते.
पीक वयाच्या 30 दिवसाचे असताना तण काढावे आणि दुसरे पाणी द्यावे.
70दिवसांनी तिसरे पाणी देणे फायदेशीर आहे, त्यामुळे पिकांना अतिरिक्त पोषणही मिळते.
क्विनोआ पिकात तण येण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे पेरणीनंतर 30 दिवसांनी व 50 दिवसांनी तण काढावे.
क्विनोआ शेतीतून किती उत्पन्न मिळणार बरं:-
क्विनोआ लागवडीसाठी कमी सिंचन लागते आणि काळजी देखील कमी घ्यावी लागते. असे असले तरी क्विनोआ पिकापासून चांगले उत्पादन घेतले जाऊ शकते. एका अंदाजानुसार एक एकर जमिनीवर 20 ते 24 क्विंटल उत्पादन मिळते.
मंडईंमध्ये क्विनोआ प्रति क्विंटल उत्पादनाची किंमत 8,000 ते 10,000 रुपये आहे. अशाप्रकारे केवळ एक एकर जमिनीवर क्विनोआची लागवड करून अल्पावधीत 2 लाख ते 2.4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवता येते.
क्विनोआ फार्मिंग करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याच्या पिकाला प्राणी खात नाहीत किंवा कीटक-रोगाचा प्रादुर्भाव होत नाही, ज्यामुळे शेतीचा अतिरिक्त खर्च कमी होतो आणि नफा अनेक पटींनी वाढतो.