कृषी

Monsoon Update: काळजी घ्या…! देशातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस

Published by
Ajay Patil

Monsoon Update: देशात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अनेक राज्यात मान्सूनच्या (Monsoon news) दुसऱ्या चरणातील पाऊस थैमान घालत आहे. यामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी उभे झाले आहे. महाराष्ट्रात (maharashtra weather update) देखील गेल्या काही दिवसांपासून पावसाने (rain) धुमशान घातलं आहे.

दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वातावरण आल्हाददायक होते, मात्र दुपारी उष्णतेमुळे लोकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. हवामान खात्याच्या (IMD) अद्ययावत माहितीनुसार, मध्य भारतात येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीचे म्हणणे आहे की, पुढील 5 दिवसांत भारताच्या मध्यवर्ती भागात सक्रिय मान्सूनची (monsoon) स्थिती राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये हलका पाऊस सुरू राहील.

उत्तर भारतातील हवामान परिस्थिती

तसेच उत्तरेकडील आणि उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 ऑगस्ट रोजी पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य भारतातील हवामानाची स्थिती जाणून घ्या

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य प्रदेशात 13 आणि 14 ते 16 ऑगस्ट, छत्तीसगडमध्ये 13 ते 15 ऑगस्ट, विदर्भात 14 ते 16 ऑगस्ट, 15 आणि 16 तारखेला मुसळधार पावसाची आणि वादळी पावसाची शक्यता आहे. 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान गुजरात, कोकण आणि गोव्यात. 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान पूर्व मध्य प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकरी बांधवांच्या चिंतेत भर पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने पावसाची शक्यता जाहीर केले असल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil