Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोसमी पाऊस (Rain) बरसायला सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चांगला सुखावला आहे. शिवाय राज्यात आता पेरणीच्या कामांचा वेग देखील वाढला आहे. मात्र असे असले तरी राज्यात अजूनही काही भागात मोसमी पावसाची (Monsoon News) हजेरी बघायला मिळाली नाही. यामुळे राज्यातील जनता तसेच शेतकरी बांधव अजूनही मान्सूनच्या (Monsoon) पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान राज्यातील अनेक भागात पेरणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत, तर काही भागात पेरणीची कामे उरकली देखील आहेत. ज्या भागात अजून पेरणीची कामे झालेली नाहीत तेथील शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकरी बांधव त्यामुळे मान्सूनच्या अंदाजाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान आता आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल एक वेगळं नाव कमावलेले परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख साहेबांचा (Panjabrao Dakh) नवीनतम अंदाज जाहीर झाला आहे. पंजाबराव डख साहेबांनी यावेळी 10 जुलैपर्यंत आपला मान्सून अंदाज सार्वजनिक केला आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाब रावांचा नवीन मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz).
काय म्हणताय पंजाबराव…!
पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांच्या मते, 25 जून ते 27 जून या कालावधीत राज्यातील अनेक भागात खूप मोठा पाऊस बघायला मिळणार आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report), राज्यातील महाराष्ट्राच्या अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अति-मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान मराठवाड्यातील औरंगाबाद तसेच इतरही अनेक जिल्ह्यात ठीक-ठिकाणी मुसळधार ते अति-मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजधानी मुंबईत देखील मोठ्या पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.
पंजाबराव डख साहेबांच्या मते, राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे. ज्या भागात अद्याप पाऊस दाखल झालेला नाही त्या भागात देखील आता मोसमी पाऊस कोसळणार आहे. 30 जून ते पाच जुलै दरम्यान राज्यात जोरदार पावसाची शक्यता यावेळी त्यांनी वर्तवली आहे.
दहा जुलै पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी लागणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. म्हणजेच आज पासून सलग पंधरा दिवस राज्यात रोजच भाग बदलत पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे.