Mushroom Varieties : मे-जून महिन्यात मशरूमच्या या जातींची लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Mushroom Farming :-देशातील शेतकरी बांधव पारंपारिक शेतीत सातत्याने नुकसान झेलत आहेत यामुळे पारंपरिक शेतीत (Traditional Crop) होणारे नुकसान पाहता गेल्या काही वर्षांत शेतकरी नगदी (Cash Crop) तसेच बाजारात मागणी असलेल्या पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत.

अशाच नगदी आणि बाजारात मागणी असलेल्या पिकांपैकी एक आहे (Mushroom Crop) मशरूमचे पीक. अलीकडील काळात शेतकऱ्यांमध्ये (Farmers) मशरूम शेती संदर्भात उत्सुकता वाढली असून अनेक शेतकरी बांधव आता मशरूम शेती (Mushroom Farming) करू लागले आहेत.

याची आता चांगलीच लोकप्रियता वाढली आहे. देशातील असंख्य शेतकरी आता मशरूमची शेती करू लागले आहेत शिवाय अल्पकालावधीत चांगला नफा कमवत आहेत.

शेतकरी मित्रांनो जर आपणास मशरूमची शेती करायची असेल तर लक्षात ठेवा की, मशरूम लागवडीसाठी थंड हंगाम अधिक योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मात्र असे असले तरी मशरूम ची लागवड उन्हाळी हंगामात देखील आता शक्य झाले आहे. भारतात मशरूमच्या अशा काही जाती आहेत ज्यांची लागवड उन्हाळ्यात देखील आता शक्य आहे.

या जातीची लागवड मे-जून महिन्यात केली जाऊ शकते असा तज्ज्ञांचा दावा आहे. निश्चितच मे आणि जून महिन्यात मशरूमच्या या जातीची लागवड करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता.

हरियाणातील सलेमगड येथे वेदांत मशरूम कंपनी चालवणारे शेतकरी विकास वर्मा यांच्या मते, या महिन्यात शेतकरी ऑयस्टर आणि मिल्की मशरूमचे (Milky Mushroom) उत्पादन घेऊन चांगला नफा मिळवू शकतात.

विकास म्हणतो की, बटन मशरूमचे (Button Mushroom) शेल्फ लाइफ फक्त 48 तासाची असते. म्हणुन वेळेवर मशरूमची विक्री झाली नाही, तर शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो.

मात्र, ऑयस्टर मशरूमच्या बाबतीत असे नाही. ऑयस्टर मशरूमची (Oyster mushrooms) सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ते उन्हाळ्यातही पिकवता येते. यासाठी एसी रूमची देखील गरज नसते.

ऑयस्टर मशरूमची विशेषता जाणुन घेऊया

•बटण मशरूमच्या तुलनेत ऑयस्टर मशरूमचे उत्पादन तंत्रज्ञान खूप सोपे आहे. शिवाय या पासून चांगले उत्पादन देखील प्राप्त केले जाऊ शकते.

•ऑयस्टर मशरूमचे उत्पादन बारामाही घेतले जातं असल्याचा दावा केला जातो. निश्चितच यामुळे मशरूम उत्पादकांना बारामाही उत्पन्न मिळू शकणार आहे.

•इतर मशरूमच्या तुलनेत, ऑयस्टर मशरूमचे उत्पादन बऱ्याच काळासाठी साठवले जाऊ शकते.

•इतर मशरूमप्रमाणे, ऑयस्टर मशरूममध्ये देखील सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि औषधी घटक असतात.

ऑयस्टर मशरूम या मशरूमच्या जातीशिवाय, शेतकरी मे-जून महिन्यात दुधाळ मशरूमचे अर्थात मिल्की मशरूमचे देखील उत्पादन घेऊ शकतात.

मात्र, असे असले तरी मिल्की मशरूमची सेल्फ लाईफ देखील बटन मशरूमप्रमाणे 48 तासांपेक्षा जास्त नसते. यामुळे मिल्की मशरूमची शेती करणे शेतकऱ्यांसाठी काही वेळा नुकसानकारक ठरू शकते.

या शिवाय ऑयस्टर मशरूमला बाजारात 700 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतो, तर मिल्की मशरूमला केवळ 200 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतो. यामुळे चांगला नफा मिळविण्यासाठी बहुतांश तज्ज्ञ शेतकऱ्यांना ऑयस्टर मशरूमची लागवड करण्याचा सल्ला देतात.