Krushi news marathi: देशातील शास्त्रज्ञांनी नॅनो युरियाचा (Nano Urea) विकास केला यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. नॅनो युरियाचा होणारा फायदा लक्षात घेता आता (Nano DAP) नॅनो डीएपी, नॅनो झिंक आणि नॅनो कॉपरवर काम आणि संशोधन जोरात सुरू आहे.
गुजरात राज्यातील कलोल येथे असलेल्या नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटरमध्ये (NBRC) संशोधनाचे काम सुरू असून, देशातील शेतकऱ्यांना (Farmer) 50 किलो पोत्यांचे ओझे आणि भावाचा फटका यातून दिलासा मिळावा यासाठी संशोधन जोरात सुरु आहे.
नॅनो युरिया (Fertilizer) व्यतिरिक्त, नॅनो झिंक, नॅनो कॉपर आणि नॅनो डीएपी देखील एनबीआरसीमध्ये विकसित केले गेले आहेत. त्यांच्या क्षेत्रीय चाचण्याही आता जवळपास पूर्ण झाल्या आहेत.
आता हे सर्व खत (Fertilizer) नियंत्रण आदेशात समाविष्ट करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उत्पादन सुरू होईल. कमी वाहतूक खर्चामुळे हे नॅनो खत शेतकर्यांचे उत्पन्न (Farmers Income) वाढविण्यास उपयुक्त ठरणार आहे.
नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटरने सांगितले की, नॅनो डीएपीच्या यशस्वी चाचण्याही देशातील 1100 ठिकाणी सुमारे दोन डझन पिकांवर करण्यात आल्या आहेत.
पारंपारिक डीएपी, झिंक आणि कॉपरपेक्षा ते किती चांगले आहे हे विविध पिकांवर वापरून त्याची कसून चाचणी केली आहे. नॅनो युरियाप्रमाणेच डीएपी आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही चांगले परिणाम दिसून आले आहेत.
देशात कोठे उभारले जातं आहेत प्लांट- नॅनो युरियाप्रमाणेच शेतकरी डीएपीचा अवलंब नक्कीच करतील, अशी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांना पूर्ण आशा आहे.
ते आल्यानंतर शेतकऱ्यांना युरिया आणि डीएपी या दोनच प्रमुख खतांची पिकांवर फवारणी करावी लागणार आहे. नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि नॅनो मायक्रोन्यूट्रिएंट्सच्या उत्पादनासाठी आमला, फुलपूर, कलोल (विस्तार), बंगळुरू, पारादीप, कांडला, देवघर आणि गुवाहाटी येथे उत्पादन प्रकल्प सुरू आहेत.
उत्पादन सुरू झाल्यानंतर देशात डीएपीची कमतरता भासणार नाही. गेल्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना डीएपीच्या मोठ्या तुटवड्याचा सामना करावा लागला. देशात सुमारे 3 लाख 13 हजार टन डीएपीचा वापर होतो.
यातून किती लोकांना रोजगार मिळेल- देशभरातील या सर्व युनिट्सची दररोज 2 लाख बाटल्यांची उत्पादन क्षमता असेल. त्यांच्या स्थापनेसाठी एकूण 3000 कोटींची गुंतवणूकही केली जाणार आहे.
त्यापैकी 720 कोटींची रक्कम आधीच वाटप करण्यात आली आहे. या प्लांट्समधून सुमारे 1000 लोकांना रोजगारही मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात नॅनो डीएपी आणि नॅनो झिंक, कॉपर, सल्फर बोरॉनच्या बाटल्या गुजरातच्या कलोल युनिटमध्ये तयार केल्या जातील.31 मे 2021 रोजी देशात नॅनो युरिया लाँच करण्यात आला होता.
मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, एक 500 मिली बाटली युरियाच्या 45 किलोच्या पिशवीच्या समतुल्य आहे. त्याला यश मिळू लागल्यावर इफकोने नॅनो डीएपीचे काम सुरू केले आहे.
यावर्षी शेतकऱ्यांना नॅनो डीएपीची भेटही मिळू शकते. त्याच्या फील्ड ट्रायलमध्येही चांगले परिणाम मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. विविध नॅनो खतांवर अधिक संशोधन करण्यासाठी 2018 मध्ये नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.