Onion Maharashtra : एनसीसीएफने शेतकऱ्यांकडून खरेदी केला २,८२६ टन कांदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Maharashtra : गेल्या चार दिवसांत थेट शेतकऱ्यांकडून २,८२६ टन कांदा खरेदी केल्याची माहिती नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया ( एनसीसीएफ) ने शनिवारी दिली. ही खरेदी २,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने झाली.

सरकारने यावर्षी कांद्याच्या राखीव स्टॉकचे उद्दिष्ट तीन लाख टनांवरून पाच लाख टन केले आहे.

देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातीवर अंकुश ठेवताना, शेतकऱ्यांनी घाबरून विक्रीचा मार्ग पत्करू नये, अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे एनसीसीएफ आणि नाफेड या दोन सहकारी संस्थांना थेट शेतकऱ्यांकडून एक लाख टन कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.

दोन्ही सहकारी संस्था सरकारी राखीव साठ्याची घाऊक आणि किरकोळ बाजारात विक्री करत आहेत. कांद्याचे भाव सध्या दिल्ली आणि इतर शहरांतील गुणवत्तेनुसार ६० रुपये किलीपर्यंत आहेत.

एनसीसीएफचे व्यवस्थापकीय संचालक अनीस जोसेफ चंद्रा यांनी सांगितले की, सहकारी संस्थेने २२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांकडून थेट खरेदी सुरू केली.

महाराष्ट्रात सुमारे १२-१३ खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत. एकूण एक लाख टन खरेदी करण्याचे उद्दिष्ट आहे. एनसीसीएफ थेट शेतकऱ्यांकडून २,४१० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करत आहे, जो सध्याच्या १,९०० – २,००० रुपये प्रति क्विंटल या घाऊक दरापेक्षा जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.