Onion News : राहुरी तालुक्यातील वांबोरी उपबाजारात गोल्टी कांद्याला २००० रुपये ते २ हजार ५०० रुपये भाव मिळाला आहे. शनिवारी (दि.४) झालेल्या कांदा लिलावात ४ हजार २२२ कांदा गोण्याची आवक झाली.
एक नंबरचा गावराण कांदा २ हजार ८०५ रुपये ते ३ हजार ६०० रूपये, दोन नंबरचा कांदा २ हजार ५ रुपये ते २ हजार ८०० रुपये तर तीन नंबरचा कांदा ३०० रुपये ते २००० रुपये भावाने विकला गेला.
तसेच गोल्टी कांद्याला २००० रुपये ते २ हजार ५०० रुपये भाव मिळाला. अपवादात्मक ४८ कांदा गोण्यांना ४ हजार ५०० रुपये, ०७ कांदा गोण्यांना ४ हजार ४०० रुपये, ३० कांदा गोण्यांना ४ हजार ३०० रुपये,
३ कांदा गोण्यांना ४ हजार २०० रुपये, १७ कांदा गोण्यांना ४ हजार १०० रुपये, ५८ कांदा गोण्यांना ४००० रुपये, ७ कांदा गोण्यांना ३ हजार ८०० रुपये तर ४७ कांदा गोण्यांना ३ हजार ७०० रुपये भाव मिळाला.
भुसार मालात बाजरी २ हजार २०० रुपये ते २ हजार ६०० रुपये, गहू २ हजार ४०० रुपये ते २ हजार ७६१ रुपये, मका २ हजार ५० रुपये तर सोयाबीन ४ हजार ५०१ रुपये ते ४ हजार ७०० रुपये प्रमाणे भाव मिळाले.