कृषी

Onion Farming: पावसाळ्यात कांदा लागवड शेतकऱ्यांना लखपती बनवणार..! फक्त ‘हे’ एक काम करावं लागणार, लाखोंची कमाई फिक्स होणारं

Published by
Ajay Patil

Onion Farming: देशात मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती (Onion Crop) केली जाते. आपल्या राज्यात (Maharashtra) कांद्याची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. खरीप (Kharif Season) पीक चक्रात अनेक शेतकरी बांधव आपल्या शेतात खरीप कांदा पिकाची लागवड करत असतात. 

खरं पाहता पावसाळ्याच्या दिवसात हवामानातील बदलामुळे कांदा पिकासाठी देखरेख आणि योग्य व्यवस्थापनाची गरज भासते, कारण तापमानातील बदलामुळे पिकामध्ये कीटक, रोग आणि तणांची संख्या वाढते. कीड नियंत्रणाबद्दल बोलायचे झाले तर, खरीप कांदा पिकावर थ्रिप्स कीटकांचा (Thrips Pest) धोका वाढतो, याच्या प्रतिबंधासाठी आगाऊ उपाय किंवा सेंद्रिय कीड नियंत्रण फायदेशीर ठरते.

मित्रांनो आपल्या राज्यात सर्वाधिक रब्बी हंगामात कांद्याचे लागवड केली जाते मात्र असे असले तरी खरीप हंगामात देखील कांद्याची लागवड (Kharif Onion Crop) विशेष उल्लेखनीय असते. अशा परिस्थितीत कांदा पिकातून दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांनी काही बाबींची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. खरीप हंगामातील लाल कांदा पिकावर सर्वाधिक थ्रिप्स या किटकांचा प्रादुर्भाव बघायला मिळतो अशा परिस्थितीत आज आपण थ्रिप्स कीटक नियंत्रण कसे करायचे याविषयी जाणून घेणार आहोत.

कांद्यामध्ये थ्रिप्स कीटक

खरीप कांदा पिकावरील थ्रीप्स किडीचा प्रादुर्भाव दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. सुरुवातीला हे किडे पिकाच्या पानांवर बसून त्यांचा रस शोषतात, त्यामुळे पानांवर चांदीसारखे चमकदार पट्टे तयार होतात. त्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने पानांवर तपकिरी डागही दिसतात. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की थ्रिप्स हे अतिशय लहान कीटक आणि पांढरे-पिवळे रंगाचे असतात.

थ्रीप्स कीटक नियंत्रणासाठी उपाय

खरीप कांदा म्हणजेच लाल कांदा पिकातील थ्रीप्स किडीच्या प्रतिबंधासाठी कडुनिंबावर आधारित कीटकनाशकांची फवारणी फायदेशीर ठरते.

शेतकऱ्यांना हवे असल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 125 मिली कीटकनाशक 500-600 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्‍टरी पिकावर फवारणी करावी.

खरीप कांदा पिकात किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास कानफिडोर 0.5 मिली 3 लिटर पाण्यात विरघळवून टिपोल सारख्या चिकट पदार्थासोबत फवारणी करावी.

लाल कांदा पिकासाठी तण व्यवस्थापन

अनेकदा पाऊस पडल्यानंतर खरीप कांदा पिकामध्ये अनावश्यक झाडे उगवतात, ज्याला तण म्हणतात. त्यांना रोखण्यासाठी, लागवडीनंतर 20-25 दिवसांनी पहिले तण काढण्याचे काम करावे असा सल्ला दिला जातो.

खरीप कांदा पिकासाठी किमान 3 ते 4 निंदणी किंवा खुरपणीची गरज असते, जेणेकरून तण उपटून फेकून देता येते.

पिकात तणांची संख्या जास्त असल्यास रासायनिक नियंत्रणही करता येते.

यासाठी 2.5 ते 3.5 लिटर पेंडीमेथालिन किंवा 600-1000 मिली ऑक्सिफ्लोरोफेन 750 लिटर पाण्यात मिसळून दर तीन दिवसांनी प्रति हेक्‍टरी पिकावर फवारणी करावी.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोणत्याही प्रकारची औषधाची फवारणी करण्याआधी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा किंवा कृषी तज्ञांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालकाचा सल्ला अपरिहार्य राहणार आहे.

Ajay Patil