कृषी

भावा नांद करा पण शेतकऱ्याचा कुठं..! पट्ठ्या कर्जबाजारी झाला पण फुकटातचं कांदा वाटला

Published by
Ajay Patil

Krushi News Marathi:- शेतकरी (Farmer) कधी काय करेल याचा काही नेम नाही. शेतकरी बांधव अनेकदा आपल्या कामामुळे इतरांना आश्चर्यचकित करून सोडतात तर अनेकदा आपल्या अजिबोगरीब कामामुळे भयाण वास्तव देखील समाजा समोर मांडत असतात.

उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad) एका शेतकऱ्याने देखील आपल्या अजिबो गरिब कामामुळे इतरांना विचार करण्यास भाग पाडले असून शेतकर्‍यांची दयनीय अवस्था समाजापुढे मांडली आहे.

जिल्ह्यातील तामलवाडी येथील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने (Onion Grower) रब्बी हंगामात कांद्याची लागवड (Onion Farming) केली आणि अपार कष्ट करून कांद्याचे पिक चांगले जोपासले मात्र ऐन काढणीच्या वेळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली.

कांदा अक्षरशः 200 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री करावा लागला यामुळे या शेतकऱ्याला कांद्यावर कुळव चालवण्याची नामुष्की ओढावली.

या शेतकऱ्याने तब्बल दोन एकर कांद्याच्या पिकावर (Onion Crop) कुळव फिरवत उर्वरित वावरातला कांदा त्यांनी गावाकऱ्यांना फुकटात वाटण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे या पट्ठ्याने यासाठी गावात दवंडी देखील दिली. या अवलियाच्या या कामामुळे पंचक्रोशीत याची मोठी चर्चा रंगली आहे.मित्रांनो तुळजापूर तालुक्यात विशेषता तामलवाडी व आजूबाजूच्या पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

या परिसरात खरीप हंगामात (Kharif Season) तसेच रब्बी हंगामात (Rabbi Season) शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेत असतात.

या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावर अवलंबून असते. सुरत गाव येथील राम गुंड हे देखील कांदा पिकाची लागवड करत असतात. रब्बी हंगामात देखील त्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती.

विशेष म्हणजे त्यांनी अपार कष्ट करून कांदा पिकांची जोपासना देखील केली होती. मात्र रब्बी हंगामातील कांदा काढणीच्या वेळी कांद्याला मात्र 200 रुपये प्रति क्विंटल असा कवडीमोल दर मिळाला आणि यामुळे या शेतकऱ्याला कांदा लागवडीसाठी आलेला खर्च देखील काढता आला नाही.

त्यामुळे त्यांनी दोन एकर कांदा पिकावर कुळव फिरवला आणि उर्वरित कांदा गावकऱ्यांना मोफत देऊ केला त्यासाठी त्यांनी गावातून दवंडी देखील पिटवली.

राम गुंड यांच्या मते, कांद्यावर कुळव फिरवण्याची नामुष्की ओढावली त्यामुळे त्यांनी हा कांदा लोकांना मोफत देण्याचे ठरवले यामुळे आगामी खरीप हंगामासाठी रान मोकळे होणार आहे.

राम गुंड यांना कांदा पिकासाठी तब्बल 70 हजाराचा खर्च आला होता मात्र सध्याचे बाजार भाव पाहता झालेला खर्च काढणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी कांदा मोफत वाटण्याचा निर्णय घेतला.

राम यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था समाजापुढे मांडली असून शेतकऱ्यांचा दिलदारपणा देखील दाखवला आहे. यामुळे भावा नांद करा पण शेतकर्‍याचा कुठं असंचं म्हणावं लागेल.

Ajay Patil