अवकाळीच्या भीतीने कांदा उत्पादक धास्तावले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील माका परिसरामध्ये यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाली आहे. कांदा काढण्याच्या वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धगधग वाढली असून कांदे काढण्याची लगबग सुरू झाली आहे.

यंदा कांदा काढण्यासाठी मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दहा ते अकरा हजार रुपये एकर कांदा काढणीसाठी पैसे देऊनसुद्धा मजूर मिळत नाही. मजुराच्या घरी दोन दोन चकरा मारुन सुद्धा मजूर मिळत नाही.

काही शेतकऱ्यांनी काढलेला कांदा व्यवस्थित साठवून ठेवण्यासाठी धावपळ चालू आहे. अगोदरच कांद्यासाठी भरमसाठ खर्च झालेला असताना मजूर मिळत नसताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

अवकाळी पावसामुळे पिकविलेला कांद्याचे माप पदरात पडत की निसर्ग हातात तोडातून काढून घेतो की काय ? यांच चिंतेत बळीराजाला डोक्याला हात लावुन बसायची वेळ आली आहे.

त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे सरकारने निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याला आज रोजी कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.