केंद्र सरकारच्यावतीने ग्राहकांना नाफेडच्या माध्यमातून सवलतीच्या दरात कांदा विक्री करण्यात येत असून त्याचा दर २५ रूपये किलो आहे.
ग्राहकांना एक व दोन किलोच्या पॅकिंगमध्ये हा कांदा खरेदी करता येत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल या महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे ही कांदा विक्री करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत २५ विक्री केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना कांदा उपलब्ध होत असून येत्या काळात विक्री केंद्र १०० पर्यंत नेण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत ग्राहक कल्याण मंत्रालय वेगवेगळ्या ग्राहक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून बाजारपेठेत हस्तक्षेप करत असते.
नागरिकांना महागाईची झळ बसू नये या उद्देशाने केंद्र सरकारने भारत चा डाळ, भारत आटा व कांदा विक्री केंद्र सुरू केली आहेत.