कृषी

Panjabrao Dakh : सप्टेंबर महिन्यातला पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज! ‘या’ तारखेपासून राज्यात कोसळणार पाऊस

Published by
Ajay Patil

Panjabrao Dakh : सध्या राज्यात सर्वत्र पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. त्यामुळे राज्यात शेती (Farming) कामाला वेग आला असून खरीप हंगामातील वेगवेगळ्या पिकांचे व्यवस्थापन (Crop Management) करण्यासाठी बळीराजा (Farmer) लगबग करत असल्याचे चित्र आहे.

मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात श्रावण सरी बरसत असल्याचे चित्र आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गजबजलेलं नाव अर्थातच हवामान तज्ञ पंजाब राव डख यांचा सुधारित हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज पासून राज्यात पाऊस (Monsoon) विश्रांती घेणार आहे.

आज 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट राज्यात कडक सूर्यदर्शन होणार असून त्यासोबतच वारे देखील वाहणार आहेत. त्यानंतर 28 ऑगस्टला राज्यातील लातूर नांदेड आणि विदर्भात पावसाची (Monsoon News) हजेरी राहणार आहे. मात्र इतर भागात पावसाची उघडीपचं राहणार आहे.

राज्यातील काही भाग वगळता 31 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार असून कडक सूर्यदर्शन होणार आहे. सोबतीला जोरदार वारे देखील वाहणार असल्याचा पंजाबराव यांचा अंदाज (Panjab Dakh Weather Report) आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी आपली शेतीची कामे या कालावधीत पूर्ण करून घ्यावीत. कारण की 31 ऑगस्ट रोजी राज्यात सर्वत्र पाऊस बरसणार आहे. एवढेच नाही तर राज्यात 3 सप्टेंबर पर्यंत पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली. या कालावधीत बरसणारा पाऊस हा राज्यात सर्वदूर असणार आहे तसेच जोरदार स्वरूपाचा राहणार आहे. निश्चितच शेतकरी बांधवांनी पावसाची उघडीप राहिल त्यावेळी शेतीची कामे करण्याचा सल्ला जाणकार देत आहेत.

दरम्यान पावसाच्या पाण्यामुळे जुलै महिन्यात तसेच ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेली. काही ठिकाणी जुलै तसेच ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसापासून खरीप हंगामातील पिके थोडक्यात बचावली आहेत.

यामुळे येथील शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिके जोपासण्यासाठी व्यस्त असल्याचे चित्र आहे. दरम्यान राज्यातील अनेक धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले असून काही धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अशा परिस्थितीत नदीकाठी वसलेल्या गावकऱ्यांना तसेच शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचे यावेळी आव्हान केले गेले आहे. निश्चितच जुलै महिन्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे काही ठिकाणी शेतातील पिके पूर्ण वाया गेले आहेत तर काही ठिकाणी पिकांना फारशी हानी झालेली नाही.

Ajay Patil

Published by
Ajay Patil