Panjabrao Dakh Havaman Andaz: मान्सूनचे (Monsoon) राज्यात 10 तारखेला आगमन झाल्याचे हवामान विभागाकडून (IMD) सांगितले गेले. दहा जूनला दक्षिण कोकणातील वेंगुर्ला दाखल झालेला मान्सून अवघ्या 24 तासात मुंबईमध्ये दाखल झाला.
मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यात मान्सूनने हजेरी लावली, मात्र सोमवारपासून मान्सून जणूकाही गायबच झाला. राजधानी मुंबईत अक्षरशः कडक ऊन बघायला मिळत आहे. यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असून मान्सूनची हुलकावणी पुन्हा एकदा बघायला मिळाली आहे.
दरम्यान मान्सूनच्या (Monsoon News) पावसाअभावी शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. शेतकरी बांधवांनी शेत जमिनीची पूर्वमशागत जरी उरकवून घेतली असली तरी देखील जोवर 100 मिलिमीटर पर्यंत पाऊस पडत नाही तोवर पेरणी करू नका असा कृषी विभागाचा सल्ला असल्याने शेतकरी बांधव देखील 100 मिलिमीटर पाऊस पडण्याची आता वाट पाहत आहेत.
यादरम्यान, शेतकर्यांमध्ये एक विश्वासाचं नाव म्हणजेच पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांचा आजचा मान्सूनचा अंदाज सार्वजनिक करण्यात आला आहे. शेतकरी बांधव देखील मान्सूनच्या प्रवासाकडे बारीक लक्ष ठेऊन आहेत. अशा परिस्थितीत पंजाबराव डख साहेबांचा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्याचे काम करू शकतो.
पंजाबरावांच्या मते, मागील काही दिवसापासून राज्यात भाग बदलून पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. एवढेच नाही तर लवकरच राज्यात सर्वत्र पाऊस हा पडणार आहे. पंजाबराव (Panjabarao Dakh News) यांच्या सुधारित अंदाजानुसार, आज दिनांक 16 जून वार गुरुवार रोजी मराठवाड्यात व पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील तसेच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात भाग बदलत बदलत पाऊस पडेल असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे.
पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांच्या मते, 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत पुर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात भाग बदलत बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच 20 जून पासून राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबराव डख साहेबांनी वर्तवला आहे.
निश्चितच पंजाब रावांच्या या अंदाजामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून येत्या काही दिवसात राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. दरम्यान पंजाबराव यांनी देखील शेतकरी बांधवांना पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला दिला आहे. निश्चितच शेतकरी बांधवांनी 100 मिलिमीटर पाऊस पडला तरच पेरणीला सुरुवात करावी.