कृषी

Panjabrao Dakh News : पंजाबरावांचा शेतकऱ्यांना कानमंत्र ! म्हटले आता पाऊस कमी पडणार नाही, यामुळे शेतकऱ्यांनी….

Published by
Ajay Patil

Panjabrao Dakh News : हवामान तज्ञ पंजाबराव डख नेहमीच आपले हवामान अंदाज साठी चर्चेत राहतात. पंजाब रावांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचा दावा शेतकरी करतात. त्यांच्या हवामान अंदाज शेतकऱ्यांना शेती करतांना सोयीचे होते, असं मत शेतकरी परखडपणे मांडत असतात.

दरम्यान हवामान तज्ञ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे एका कृषी मेळाव्यात उपस्थित राहिले असता त्यांनी शेतकरी बांधवांना हवामानावर आधारित शेती करण्याचा सल्ला दिला आहे. पंजाबराव डख यांच्या मते, शेतकरी बांधवांनी निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती केली तर त्यांना नुकसान होईल मात्र हवामानावर व निसर्गावर आधारित शेती केली तर त्यांना निश्चितच विपरीत परिस्थितीमध्ये देखील अधिक उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.

यावेळी त्यांनी पावसाबाबत काही महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली. त्यांच्या मते पावसाने दिशा बदलली आणि तापमानात वाढ झाली तर मोठ्या प्रमाणात पाऊस येतो. अशा परिस्थितीत प्रत्येकाने निदान एक झाड लावले पाहिजे. कारण की झाडामुळे तापमान कमी होईल आणि भविष्यात जास्तीच्या पावसाचा धोका शेतकऱ्यांना जाणवणार नाही. शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्यात सदर शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पंजाबराव डख यांनी आता भविष्यात पाऊस कमी पडणार नाही, पावसाचे प्रमाण हे अधिक राहणार आहे. यामुळे श्री दत्त साखर कारखान्याने क्षारपड जमीन मुक्तीसाठी वापरलेली सछिद्र पाईपलाईनची व्यवस्था सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केली पाहिजे. त्यामुळे शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे. असे मत या कार्यक्रमादरम्यान पंजाब रावांनी मांडले.

हवामानावर आधारित शेती या विषयावर सदर शेतकरी मेळाव्याचे आयोजन झाले होते. पुढे पंजाबरावांनी बियाणे खतपाणी या सर्वांचा वापर पिकांसाठी करणे हे शेतकऱ्यांच्या हातात आहे. मात्र निसर्ग शेतकऱ्यांच्या हातात नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी हवामानाचा आणि वातावरणातील बदलाचा अभ्यास करणे अत्यावश्यक ठरणार असून यासाठी शेतकरी बांधवांना सखोल अभ्यास करावा लागणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil