Panjabrao Dakh : मित्रांनो सध्या राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. खरं पाहता नोव्हेंबर मध्ये तीव्र थंडी जाणवायला हवी. मात्र अद्यापही राज्यात थंडीचा जोर पाहायला मिळत नाही. दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या मते, वैश्विक तापमान वाढ आणि वातावरण बदलामुळे राज्यात अजून थंडीचा जोर वाढलेला नाही. राज्यात अजून एक महिन्यानंतर थंडीचा जोर वाढणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे.
म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात सुरु होणारी थंडी आता डिसेंबर मध्ये सुरु होणार आहे. नोव्हेंबर मध्ये राज्यात कडक उकाडा जाणवेल असं भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान देशातील अनेक भागात ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
याशिवाय आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामाना अंदाजनुसार राज्यात आठ नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंजाबराव डख यांच्या मते सांगली सातारा सोलापूर आणि नांदेड या चार जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडे राहणार आहे. सध्या राज्यात खरीप हंगामातील पिकांची काढणी प्रगतीपथावर असून रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरु आहे. पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे वर्तवले असल्याने शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना सल्ला देत रब्बी हंगामातील पीक पेरणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे.
पंजाबराव डख यांच्या मते, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा या पिकाची 20 नोव्हेंबर पर्यंत पेरणी केली पाहिजे. 20 नोव्हेंबर पर्यंत हरभरा पिकाची पेरणी केल्यास शेतकरी बांधवांना अधिक उतारा मिळणार आहे. तसेच गव्हाची 15 नोव्हेंबर पर्यंत वेळेवर पेरणी केली जाऊ शकते. निश्चितच शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी आता लगबग सुरू केली पाहिजे.
दरम्यान राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी पुढे सरसावले असल्याचे चित्र आहे. एकंदरीत येत्या काही दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांना सजग राहण्याचे आवाहन केले जात आहे.