कृषी

मोठी बातमी: शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा! सरकारच्या माध्यमातून परिपत्रक जारी

Published by
Ahmednagarlive24 Office

मागील काही महिन्या अगोदर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती व त्याचा फटका हा शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर बसला होता. यामध्ये कांद्यासारखी पिके व अनेक फळबागांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या या नुकसानीची भरपाई मिळावी अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती.

साधारणपणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. या सगळ्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यासंबंधीची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आला होता व आता त्यानुसार यासंबंधीचे महत्त्वाचे परिपत्रक राज्याच्या महसूल व वन विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता त्यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार आता तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाल्यामुळे शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते व या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात आला होता.

त्या दृष्टिकोनातून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी नुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी हेक्टरी 13600 रुपये, बागायती करीता हेक्टरी 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईपोटी हेक्टरी तब्बल 36 हजार रुपयांची मदत करण्याचे निर्देश राज्याच्या महसूल व वन विभागाच्या माध्यमातून परिपत्रकाद्वारे आता जारी केले आहेत.त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना यापुढे मोठा दिलासा मिळणार आहे.

निकषांच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश देण्यात आले होते.मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नव्हती व त्यामुळे शेतकऱ्यांनी या विरोधात रोष व्यक्त केला होता व अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर देखील उतरले होते. या सगळ्या प्रकरणाची राज्य सरकारने दखल घेत बाधित शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर जाऊन तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आता दिले आहेत.

Ahmednagarlive24 Office