PM Kisan 14th Installment : अवघे काही तास बाकी! पंतप्रधान DBT द्वारे या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार २ हजार रुपये, जाणून घ्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan 14th Installment : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे.

पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत १३ हफ्ते देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच १४वा हफ्ता वर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी अवघे काही तास राहिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे DBT द्वारे साडेआठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची १४व्या हफ्त्याची प्रतीक्षा संपली आहे. उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदींकडून पैसे जमा केले जाणार आहेत.

उद्या म्हणजेच २७ जुलैला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे PM किसान 14वा हप्ता जमा करणार आहेत.

थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील

ज्या शेतकऱ्यांच्या आधार आणि NPCI शी जोडलेले बँक खाते आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात १३वा हफ्ता जमा करण्यात आला होता.

पीएम किसान योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात.

हे पैसे शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी ३ हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. शेतकऱ्यांना एका हफ्त्यामध्ये २ हजार रुपये दिले जातात. पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी डिसेंबर 2018 मध्ये सुरु करण्यात आली आहे. सध्या सरकारकडून शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमीन पडताळणी करणे बंधनकारक केले आहे.