PM Kisan 14th Installment : पीएम किसान लाभार्थ्यांनो इकडे द्या लक्ष! या नियमाचे पालन न केल्यास अडकू शकतात १४व्या हफ्त्याचे पैसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan 14th Installment : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. तसेच या योजनेनमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील होत आहे.

केंद्र सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक हातभार लागत आहे.

शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत १३ हफ्ते दिले गेले आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांना १४वा हफ्ता दिला जाणार आहे. मात्र त्याआधी शेतकऱ्यांना एक काम करावे लागणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार नाहीत.

देशातील लाखो शेतकरी १४व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २ हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. मात्र सरकारकडून १४वा हफ्ता मिळवण्यासाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत.

१४वा हफ्ता मिळवण्यासाठी हे काम महत्वाचे

केंद्र सरकारकडून जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांची जमीन पडताळणी प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन जमिनीची पडताळणी करणे आवश्यक आहे. जर पात्र शेतकऱ्यांनी जमिनीची पडताळणी केली नाही तर शेतकऱ्यांचे १४व्या हफ्त्याचे पैसे अडकू शकतात.

कोणत्या खात्यात पैसे येतील

PM-किसान सन्मान निधी योजनेच्या 14व्या हप्त्याचे पेमेंट आधार आणि NPCI या दोन्हीशी जोडलेल्या बँक खात्यात केले जाईल. म्हणजेच, तुमचे खाते NPCI आणि आधार-लिंक केलेले बँक खाते असल्याची पडताळणी करावी लागेल.

सरकारी निर्देश

लाभार्थींचे बँक खाते आधार आणि NPCI शी लिंक करण्यासाठी भारत सरकारने पोस्ट विभागाला अधिकृत केले आहे. म्हणून, तुम्ही लवकरात लवकर

जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये नवीन (DBT सक्षम) खाते उघडावे.

याशिवाय, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांचे eKYC पूर्ण करावे लागेल.

14 वा हप्ता कधी येईल

पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा १४वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थान येथून २७ जुलै २०२३ रोजी १४ वा हफ्ता जाई केला जाणार आहे. तसेच नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत.