कृषी

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

PM Kisan Samman Nidhi Yojana : ज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. “PM किसान योजनेत पारदर्शकता असायला हवी. खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल केला असेल असे मला वाटते,” असे शिंदे म्हणाले. या विधानामुळे योजनेत बदलांबाबत चर्चा अधिकच रंगली आहे.

शेतकऱ्यांसाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत

PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना योजनेचे 18 हप्ते मिळाले आहेत. पुढील फेब्रुवारीमध्ये 19 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र, केंद्र सरकारने योजनेच्या अंमलबजावणीतील नियमांमध्ये कोणते बदल केले आहेत, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.

शिवसेनेत प्रवेशाचा ओघ

नाशिक, दिंडोरी, निफाड येथील पदाधिकारी आणि माजी आमदार दुशंत चतुरवेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. “शिवसेना मोठ्या वेगाने पुढे जात आहे. राज्यात विकासाची गरज असलेल्या भागांमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचे काम आम्ही करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

PM किसान योजनेत नियमांमध्ये बदल का आवश्यक?

शिंदे यांनी योजनेत पारदर्शकता आणि गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यावर भर दिला. “प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल केला असेल असे मला वाटते,” असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी अधिक चांगल्या व्यवस्थेची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांवरील लक्ष

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणून लढवण्याची तयारी सुरू आहे. काही ठिकाणी परिस्थितीनुसार कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24