Pm Kisan Update:- शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांमध्ये जर आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेचा विचार केला तर 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी अशा योजनांपैकी एक योजना असून आतापर्यंत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना एकूण 2.42 लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे.
आपल्याला माहित आहे की या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. परंतु सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये किंवा मुहूर्तावर या योजनेसंबंधी एक चांगली बातमी येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पीएम किसान योजनेत आता शेतकऱ्यांना मिळणार
6 ऐवजी 8 हजार?याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सध्या देशामध्ये निवडणुकांचे वारे वाहत असून नुकतेच देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत व येणाऱ्या काही दिवसांमध्ये देशात लोकसभेची निवडणूक देखील होणार आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी भेट म्हणून केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सहा हजार रुपयांची रक्कम तब्बल दोन हजार रुपयांनी वाढवून ती आठ हजार रुपये करण्याच्या तयारीत असून त्यासंबंधीच्या हालचाली सुरू असल्याची माहिती देखील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. एवढेच नाही
तर यासंबंधीचा प्रस्ताव या महिन्याच्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील मांडला जाईल अशी शक्यता आहे. जर आपण या संबंधीचा ब्लुमबर्गचा अहवाल पाहिला तर त्यानुसार केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेच्या रकमेमध्ये एक तृतीयांश वाढ करण्याच्या विचार करत आहे.
केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत रक्कम वाढवण्याचा निर्णय मंजूर केला तर केंद्र सरकारवर या योजनेसाठीचा वीस हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. परंतु हे पाहिले तर हे तज्ञांचे मत आहे.परंतु सरकार येणाऱ्या दिवसात या बाबतीत काय निर्णय घेते हे येणाऱ्या कालावधीतच कळेल.