कृषी

Pomegranate Farming : अशा पद्धतीने डाळिंब लागवड करा आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Pomegranate Production :- देशातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात डाळिंबाची शेती (Pomegranate Farming) करत असतात. उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून देशातील शेतकरी बांधव (Farmer) फळबाग लागवड (pomegranate orchard) करत आहेत.

फळ पिकांपैकी प्रमुख असलेल्या डाळिंबाची लागवड सर्वात जास्त केले जाते. हेच कारण आहे की देशाच्या एकूण डाळिंब उत्पादनात (Pomegranate Production) भारताचा मोठा वाटा असून भारत डाळिंब उत्पादनात अव्वल स्थानी विराजमान आहे.

खरं पाहता, डाळींबाचे उगमस्थान इराण असल्याचा दावा केला जातो. मात्र आता याची लागवड संपूर्ण जगात केली जाते. भारतात याची लागवड सर्वाधिक आहे.

भारताच्या एकूण डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातील कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू हे राजस्थान हे राज्य देखील मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन घेत असतात.

आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, एकट्या महाराष्ट्रात 90 हजार हेक्‍टर क्षेत्रावर डाळिंब लागवड केली जाते आणि डाळिंब लागवडीच्या बाबतीत महाराष्ट्र (Maharashtra) प्रथम क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात डाळिंबाचे एकूण 9.45 लाख टन वार्षिक उत्पादन होते. आपल्या राज्याची डाळिंबची उत्पादकता देखील इतर राज्यांपेक्षा अधिक आहे.

महाराष्ट्राची डाळिंब उत्पादकता 10.5 दशलक्ष टन/हेक्‍टर एवढी दमदार आहे. भारताच्या डाळिंबाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 78 टक्के आणि डाळिंबाच्या एकूण उत्पादनाच्या 84 टक्के वाटा आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे. यामुळे आज आपण डाळिंब शेतीच्या काही महत्त्वपूर्ण बाबी जाणून घेणार आहोत.

डाळिंब लागवडीसाठी आवश्यक आणि उपयुक्त हवामान मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, डाळिंब वाढीसाठी कोरडे हवामान अधिक योग्य असल्याचा दावा कृषी वैज्ञानिक करतात. डाळिंब फळांच्या विकासाच्या आणि पिकण्याच्या महत्वपूर्ण अवस्थेत उष्ण आणि कोरड्या हवामानाची आवश्यकता असते.

उन्हाळ्यात उष्ण आणि कोरडे हवामान आणि हिवाळ्यात थंड आणि कोरडे हवामान आवश्यक आहे. असे असले तरी, डाळिंबाचे पीक थंड हवामान सहन करू शकत नाही. जर डाळिंब थंड प्रदेशात वाढले असेल तर ते चांगले वाढत नाही किंवा फुले येताच फुल गळ होत असते अर्थातच अशा प्रदेशात डाळिंब सेटिंग व्यवस्थित होत नाही.

डाळिंब लागवड कोणत्या महिन्यात करावी शेतकरी बांधवांनो जर आपणांस डाळिंबाची लागवड उपोष्णकटिबंधीय प्रदेशात करायची असेल तर आपण फेब्रुवारी-मार्च या महिन्यात डाळिंबाची लागवड करावी असा सल्ला कृषी वैज्ञानिक देत असतात.

याशिवाय जर आपणास उष्णकटिबंधीय प्रदेशात डाळिंबाची लागवड करायची असेल तर जुलै-ऑगस्ट या महिन्यात याची लागवड करावी असा सल्ला दिला जातो. या पिकाची एअर लेयरिंग सहसा पावसाळ्यात आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात केली जाते.

डाळिंब लागवडीसाठी माती कृषी वैज्ञानिक सांगत असतात की, डाळिंब वेगवेगळ्या जमिनीत वाढत असते. असे असले तरी, याची लागवड खोल आणि जड चिकणमाती असलेल्या आणि चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन मिळवले जाऊ शकते.

डाळिंब पीक काही प्रमाणात क्षारता सहन करण्यास सक्षम असते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, जमिनीत ओलावा असल्यास फळांना तडे, भेगा अर्थात क्रॅक पडतात आणि उत्पादनात मोठी घट होते. यामुळे आदर्ता असलेल्या जमिनीत याची लागवड करू नये असा सल्ला दिला जातो.

डाळिंब लागवडीचे सिंचन डाळिंब पिकासाठी हवामान आणि झाडांच्या गरजा लक्षात घेऊन पाणी दिले जाते. पावसाळा सुरू होईपर्यंत त्यांना नियमितपणे पाणी दिले जाते. हिवाळ्यात 2 आठवड्यातून एकदा आणि उन्हाळ्यात साप्ताहिक आधारावर पाणी दिले जाते हे आम्ही सांगू इच्छितो.

डाळिंबास पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा असे सांगितले जाते यामुळे डाळिंबासाठी पाण्याचे व्यवस्थापन अचूक होते शिवाय विद्राव्य खते देखील योग्य प्रमाणात डाळिंबास देण्यास मदत होते. यामुळे निश्चितच डाळिंबाच्या उत्पादनात भरीव वाढ होते याशिवाय डाळिंबासाठी आवश्यक असलेल्या उत्पादन खर्चात बचत होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office