रब्बीचे हमीभाव जाहीर ! तीळ, मूग, सूर्यफूल उत्पादक शेतकरी मालामाल, कोणत्या पिकांस किती हमीभाव? हागू,हरभरा यांची किती झालीये पेरणी? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Agricultural News : रब्बी हंगामामधील पिके आता काही दिवसात काढणीला येतील. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २०२३- २४ साठी हमीभाव जाहीर केला आहे. यंदाचा हमीभाव पाहता मागीलवर्षी असणाऱ्या भावापेक्षा यंदा दरवाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

हमीभाव वाढला असला तरी उत्पादन खर्चदेखील वाढत चाललेला आहे. त्यामुळे तुलनेत ते एकच गणित होते. असे असले तरी वाढत्या हमीभावाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

* हमीभाव म्हणजे काय? शासन हा दर कसा ठरवतो?

खरीप आणि रब्बी हंगामासाठी स्वतंत्रपणे हमीभाव जाहीर करण्यात येतात. राज्यातून कृषीमूल्य आयोग केंद्र शासनाला तशी शिफारस करतात. यामध्ये मजुरी, यंत्र मजुरी, भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, अवजारे यावरील खर्च,

सिंचन शुल्क आणि शेत बांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप संच चालवण्यासाठी डिझेल, वीज आदी स्वर्च, कौटुंबिक श्रमाचे मूल्य यासाठीचे सर्व देय खर्च समाविष्ट असतात. यादवरे हमीभाव ठरवला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना माफक दर मिळण्यास मदत होते.

* शेतकऱ्यांची काय आहे अपेक्षा

मागील वर्षी सोयाबीनला सहा हजारांपेक्षा जास्त दर मिळाला होता. त्यामुळे यंदा सोयाबीन पीक घेतले तर भाव चार हजारांवर आला. यंदा पाऊस नसल्याने सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन आले नसले तरी हमीभावात म्हणावी तितकी वाढ झाली नाही.

बाजरी, ज्वारीच्या हमीभावात आणखी वाढ अपेक्षित होती. शासनाने अधिक उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना क्षेत्रानुसार पुरवावे आदी मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.

* कोणत्या पिकाला किती मिळालाय हमीभाव

भात – २२०३

ज्वारी (हायब्रीड) – ३१८०

ज्वारी (मालदांडी) – ३२२५

बाजरी – २५००

मका – २०९०

तूर – ७०००

मूग – ८५५८

उडीद – ६९५०

भुईमूग – ६३७७

सूर्यफूल – ६७६०

सोयाबीन – ४६००

तीळ – ८६३५

* जिल्ह्यात हरभरा , गव्हाची काय असणार स्थती

रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचे पेरणी करतो. यंदादेखील किमान ८८ हजार ३०० हेक्टरमध्ये हरभरा पेरणीची शक्यता आहे. सध्या १६ हजार हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. गव्हाची देखील पेरणी सुरु असून काही ठिकाणी पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात यंदा ८६ हजार हेक्टरमध्ये गव्हाच्या पेरणीची शक्यता आहे. सद्यस्थितीत ५ हजार हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. कमी पाऊस, उशिरा झालेला पाऊस आदी गोष्टींमुळे सध्या पेरण्या लेट होत चाललेल्या आहेत. ज्या भागात आज गहू खुरपणीला यायला हवा त्या ठिकाणी अजूनही पेरणी झालेली नाही.

* युरियाचा तुटवडा

गहू पेरला की खुरपणीवेळी त्याला युरिया मारला जातो. परत्नू मागील काही दिवसात युरियाचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी युरिया उपलब्ध नाही. तर काही ठिकाणी युरिया ब्लॅकमध्ये विकला जात असल्याचे शेतकऱ्यांची ओरड आहे.