Rabi Season : शेतकरी नव्या जोमाने कामात ! खरीपपूर्व मशागतीच्या कामांना आला वेग

Ahmednagarlive24 office
Published:

मागील खरीप व रब्बी हंगाम तसेच दुष्काळाच्या संकटावर मात करून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी गुंतला असून, मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातही खरीपपूर्व कामांना वेग घेतला आहे. खरिपाच्या पेरणीसाठी लागणार्‍या पैशाच्या अडचणीत सापडल्याने शेतकर्‍याची दमछाक होत असली तरी पुढील हंगाम चांगला होईल या आशेवर शेतकरी नव्या जोमाने कामाला लागला आहे.

२०२२-२०२३चा खरीप हंगाम अतिवृष्टीने तर २०२३-२०२४ चा खरीप हंगाम आयल्प पावसामुळे त्यानंतर अवकाळी पावसांचा फटका दोन्ही हंगामाला बसला, त्याचबरोबर दुष्काळाच्या संकटामुळे रब्बी हंगाम गेला. अशा नैसर्गिक संकटामुळे मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांचे अवसान गळून पडले. त्यातच कांदा, कापसाला मिळत असलेल्या मातीमोल भावाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे तर चार महिन्यापासून ऊसाचे पैसे मिळाले नाही.

परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परंतु आज नाही, तर उद्या है नुकसान भरून निघेल या आशेवर शेतकरी तग धरून उभा आहे. त्यातच यंदा हवामान तज्ञाकडून पावसाळ्यात चांगला पाऊस असल्याचे संकेत दिलाने शेतकरी नव्याने खरीप हंगाम पूर्व मशागतीच्या तयारीला लागला आहे. त्या रष्टीने मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात नांगरट, मशागत ट्रॅक्टर साह्याने करण्याचा कामाने वेग घेतला आहे.

त्यात मे महिन्यात उन्हाचा कडाका अधिक तीव्र होत असताना शेतकरी या उन्हात ट्रॅक्टरद्वारे शेताची मशागत करण्याचे काम करीत आहेत. अतिवृष्टी, अवकाळीचे अनुदान देण्याची मागणी मागील वर्षाचे अतिवृष्टी व यंदाच्या अवकाळी येणे नुकसान झालेल्या पिकाचे अनुदान अद्यापही तहसील कार्यालयाकडून जमा झालेले नाही.

सध्या निवडणुकीच्या काळात प्रशासनाने या कामामुळे दुर्लक्ष होत आहे. परंतु, निवडणूक संपल्याबरोबर हे अनुदान त्वरित वितरित केल्यास ते शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या मशागतीसह बियाणे व खताच्या खरेदीसाठी उपयोगी येतील, मागील खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे पिके तंग धरू शकले नाहीत, रब्बीची दुबार पेरणी करूनही पिके हाती आली नाही. जेमतेम मिळालेला कापसाला योग्य भाव मिळाला नाही. परिणामी शेतीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न हाती आले नाही. – दशरथ शेळके, शेतकरी शहस्टाकळी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe