निसर्गाने मानवाला इतके भरभरून दिले आहे ही निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही मानवाला अनेक अंगांनी उपयुक्त आहे. निसर्गातील वनसंपदा हा आयुर्वेदाचा एक समृद्ध स्त्रोत म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
त्याचप्रकारे विविध प्रकारचे पालेभाज्या तसेच फळे देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून त्यांना आयुर्वेदामध्ये विशेष स्थान आहे. अगदी याच पद्धतीने अशी अनेक प्रकारचे फळे आहेत. त्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही किंवा आपण कदाचित कधी पाहिलेही नसतील.
परंतु अशा फळांचा जर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते उच्च स्थानी आहेत. अशाच प्रकारचे एक फळ म्हणजे लासोडा हे होय. हे फळ देखील खूप महत्वपूर्ण असून याला त्याच्या विशेष गुणधर्मामुळे आयुर्वेदामध्ये विशेष स्थान आहे. लासोडा फळाबद्दल माहिती
लासोडा फळाबद्दल माहिती
निसर्गातील बरेच फळे किंवा भाज्या आपल्याला माहितीच नसतात किंवा यापूर्वी आपण कधी खाल्ल्या देखील नसतात. अगदी याच पद्धतीचे एक फळ आहे ते म्हणजे लासोडा हे होय. हे फळ तुम्ही क्वचित पाहिले असेल किंवा याबद्दल ऐकले असेल.
परंतु सध्या काही दिवसांपासून हे फळ बाजारपेठेत दिसू लागले आहे. हा कालावधी या फळाचा असून बहुतेक जणांना त्याची माहितीच नसते. या फळाला गोंडी आणि निसोरी असे देखील म्हणतात.
जर आपण लासोडा या फळाचे शास्त्रीय नाव पाहिले तर ते कॉर्डिया लाईक्सा असे आहे. हे फळ आकाराने लहान असून औषधी गुणांनी समृद्ध आहे. जर आपण आयुर्वेदानुसार विचार केला तर या या फळाचा उपयोग अनेक रोगांवर उपचार म्हणून केला जातो.
अनेक लोक लासोड्याचे लोणचे किंवा पावडर बनवून ठेवतात. हे लहान व गोल आकाराचे फळ असून ऑलिव्ह किंवा चेरीफळासारखे दिसते. या फळाला गोड आणि तुरट चव असते व पिकल्यावर ते फिकट हिरव्या रंगापासून पिवळसर- तपकिरी किंवा लालसर तपकिरी रंगाचे होते. या फळाची चव पिकल्यावर अधिक तीव्र होते.
लासोडा फळाचे औषधी गुणधर्म
या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कॅलरीज कमी असतात. तसेच फायबरचे प्रमाण चांगले असते. तसेच विटामिन सी, विटामिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह इत्यादी जीवनसत्ते मोठ्या प्रमाणावर आहे.
हे फळ ज्याप्रमाणे कच्चे खाता येते तसेच त्यापासून जॅम, जेली आणि ज्यूस देखील बनवले जाते. काही लोक त्यापासून पावडर बनवून देखील त्याचा वापर करतात. पचनास मदत करणारे गुणधर्म देखील याच्यात असल्याचे मानले जाते.
तसेच सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजारांवर देखील नैसर्गिक उपाय म्हणून या फळाचा वापर केला जातो. या फळाची उत्तम चव आणि औषधी गुणधर्म यासाठी ते अगदी मूल्यवान असे आहे. दक्षिण आशियाई देशातील पाककृतीमध्ये हे एक लोकप्रिय फळ असून त्याचे चव आणि आरोग्याच्या फायद्यामुळे अनेक जण त्याचा वापर करतात.
हे दुर्मिळ फळ कुठे मिळते?
लासोडा फळाचा विचार केला तर ते ओलसर आणि कोरड्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. गुजरात, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात ते आढळून येते. लासोड्याचे फळच नाहीतर त्याच्या झाडाचे लाकूड देखील खूप उपयुक्त आहे. लासोड्याचे लाकूड मजबूत आणि गुळगुळीत असल्यामुळे त्याचा वापर हा फर्निचर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.