Rose Farming: मित्रांनो जसं की आपणास ठाऊक आहे गुलाब (Rose) हे जगातील सर्वात सुंदर फुलांपैकी एक आहे. त्याची मागणी आज जगात सर्वाधिक आहे. भारतातील लोकांनाही गुलाब खूप आवडतात. गुलाब आज एक व्यावसायिक वनस्पती बनलं आहे.
त्याशिवाय कोणत्याही सणाचे सौंदर्य फिके वाटते. त्यामुळेच गुलाबाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला गुलाबच्या लागवडीविषयी (Rose Cultivation) सांगणार आहोत. गुलाब शेतीने शेतक-यांना (Farmer) कसे श्रीमंत केले आहे याची सविस्तर माहिती देणार आहोत.
परदेशात गुलाबांना मोठी मागणी
मित्रांनो आपल्या देशातील गुलाबाची पाकिस्तान, दुबई, मलेशियासह जगभरातील देशांमध्ये निर्यात केली जात आहे.
गुलाब लागवडीकडे कल वाढण्याचे कारण काय
मित्रांनो खरं पाहता अतिशय कमी खर्चात गुलाबाची शेती (Farming) करता येते आणि नंतर त्याची फुले विकून चांगला नफा मिळवता येतो. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, एका बिघामध्ये 24 गुलाबाची रोपे लावण्यासाठी फक्त 24,000 रुपये खर्च येतो.
लागवडीनंतर किती दिवसांनी फुले येतात
साधारणपणे, गुलाबाच्या झाडांना (Rose Crop) 70 दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. म्हणजे गुलाब लागवड केल्यानंतर मोजून 70 दिवसानंतर शेतकरी बांधवांना या पासून उत्पन्न (Farmer Income) मिळण्यास सुरवात होते. यामुळे अल्प कालावधीत शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
गुलाबाची लागवड कशी करावी
गुलाबाची लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली तयार करावी लागते. नांगरणीनंतर शेणखत जमिनीत चांगले मिसळले जाते. मग दोन-तीन दिवस जमीन तशीच राहू द्यावी. त्यानंतर गुलाबाची रोपे 2 ओळींमध्ये झिगझॅग पद्धतीने 12 इंच अंतरावर लावली जातात.
काय काळजी घ्यावी
गुलाबाची झाडे अतिशय नाजूक असतात. यामध्ये रोग आणि कीटक सहजपणे लागतात, ज्यामुळे वनस्पती लवकर सुकते. तसेच गुलाब शेतीसाठी माती खूप ओली किंवा खूप कोरडी नाही ना याची खात्री करावी लागते.
जास्त फुले कधी येतात
गुलाबाची झाडे फेब्रुवारी ते जून या कालावधीत जास्तीत जास्त फुले देतात. हिवाळ्यात फुलांची संख्या थोडी कमी होते. जर गुलाबाच्या वनस्पतींचे सार योग्यरित्या हाताळले गेले तर ते खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा प्रत्येक बाजारपेठेत हे विकले जाऊ शकतात, म्हणूनच आजकाल गुलाब लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.