Shetkari Yojana 2022 : भारता एक शेतीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्थाही शेतीवर आधारित असल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) जीवनमान उंचावण्यासाठी आपल्या देशात अनेक शेतकरी हिताच्या योजना (Yojana) सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या (Farmer Scheme) माध्यमातून शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
अलीकडे पावसाळ्यात अनेक शेतकरी आर्थिक संकटातून जात आहेत. कष्ट करूनही खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतीची पूर्व मशागत करण्यापासून ते पेरणी करण्यापर्यंत मोठा खर्च शेतकऱ्यांना पेलणे कठीण होऊ शकते.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी सरकारी आणि खाजगी संस्थांनी अनेक योजना राबवल्या आहेत. ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधव शेतीसाठी आवश्यक खर्चाची रक्कम कर्जाच्या (Agriculture Loan) स्वरूपात घेऊ शकता. या योजनांतर्गत (Agricultural Scheme) शेतकऱ्यांना माफक दरात कृषी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
ही कृषी कर्जे सहजपणे दिली जातात, ज्याचा फायदा घेऊन शेतकरी आरामात चिंता न करता शेती करू शकतात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या आहेत या योजना ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जाची उपलब्धता करून दिली जाते.
किसान क्रेडिट कार्ड योजना
भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवत असलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज दिले जाते. किसान क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे KCC कर्जासोबत शेतकरी त्यांच्या पिकांचा विमाही काढू शकतात.
या योजनेचा विस्तार करत आता पशुपालक आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना माफक दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. अलीकडेच, भारत सरकारने शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कर्जावर वार्षिक 1.5% सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून वाचू शकतात.
SBI कृषक उत्थान योजना
स्टेट बँक ऑफ इंडियाही शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सातत्याने काम करत आहे. ही संस्था 20 हजार रुपयांच्या वापरावर शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांचे कर्जही देते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे SBI कृषक उत्थान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा म्हणजेच तारण ठेवावे लागणार नाही. दुसरीकडे कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास शेतकऱ्यांना पुन्हा कृषी कर्जाची सुविधा देता येईल.
सोने तारण ठेवून देखील दिले जाते कर्ज
कृषी सुवर्ण कर्जासाठी शेतकरी SBI शाखेशीही संपर्क साधू शकतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्याची पात्रता, शेतीच्या नोंदी, काही कागदपत्रे इत्यादी पाहिल्या जातात, त्यानंतर काही अधिकृत प्रक्रियेनंतर कृषी सुवर्ण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कृषी कर्ज योजना देशातील बड्या शेतकऱ्यांसाठी मोठी मदत करणारी आहे.
जमीन खरेदी योजना
आजही अनेक शेतकरी जमीन भाडेतत्त्वावर घेऊन किंवा दुसऱ्याच्या शेतात काम करून उदरनिर्वाह करतात. यामुळे भूमिहीन शेतमजुरांसाठी तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जमीन खरेदी योजना राबवण्यात आली आहे. गरीब, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी यांना याचा सर्वाधिक फायदा होतो.
हे शेतकरी माफक दरात कर्ज घेऊन शेतीसाठी जमीन खरेदी करू शकतात. जमीन खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्याला त्याला कोणती जमीन खरेदी करायची आहे याची माहिती द्यावी लागते. यानंतर जमिनीची किंमत मोजून 85 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाशी संपर्क साधू शकता.
कृषी व्यवसायांसाठी कर्ज मिळतं
शेतीसोबतच शेतकऱ्यांना इतर शेती कामांशी जोडले जात आहे, जेणेकरून शेतीवर पूर्ण अवलंबित्व राहू नये आणि नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना इतर व्यवसायाशी जोडून आर्थिक संकटातून वाचवता येईल.
या कामात, नाबार्ड शेतकऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज आणि प्रशिक्षित कृषी स्टार्ट-अपसाठी 1 कोटी रुपयांपर्यंतचे सामूहिक कर्ज देखील देते. या योजनेंतर्गत, कृषी व्यावसायिक किंवा उद्योजकांना प्रकल्पाच्या एकूण युनिट खर्चाच्या 36 ते 44 टक्के कर्ज दिले जाते.