कृषी

Shimla Mirchi Lagwad : खरं काय! शिमला मिरचीच्या ‘या’ सुधारित जातींची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल

Published by
Ajay Patil

Shimla Mirchi Lagwad : भारतात गेल्या काही वर्षांपासून भाजीपाला लागवड (Vegetable Farming) मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. भाजीपाला पीक (Vegetable Crop) कमी कालावधीत आणि कमी खर्चात उत्पादन देण्यास तयार होत असल्याने अलीकडे शेतकरी बांधवांचा (Farmer) ओघ भाजीपाला लागवडीकडे आहे.

विशेष म्हणजे शेतीव्यवसायातील (Farming) जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना भाजीपाला शेती करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. सिमला मिरची (Capsicum Crop) हे देखील असंच एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकाची लागवड (Capsicum Farming) देखील आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. शिमला मिरचीला भारतीय बाजारपेठेत मागणी अलीकडच्या काळात खूप वाढली आहे.

अशा परिस्थितीत यांची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, सिमला मिरचीशिवाय चायनीज जेवण अपूर्ण आहे. याशिवाय लोकांना सॅलडच्या रूपातही सिमला मिरची खायला आवडते. यामध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते.

म्हणूनच लोक त्यांच्या आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात याचा समावेश नक्कीच करतात. सिमला मिरचीची वाढती मागणी लक्षात घेता, हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर सौदा ठरू शकतो. मात्र असे असले तरीही शेती व्यवसायातील जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना शिमला मिरचीच्या सुधारित जातींची (Capsicum Variety) लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत आज आपण सिमला मिरचीच्या सुधारित जाती जाणून घेण्याचा थोडक्यात पण सविस्तर प्रयत्न करणार आहोत.

बॉम्बे (रेड सिमला मिरची) – सिमला मिरचीची ही जात खूपच लवकर काढणीसाठी तयार होत असल्याचा दावा केला जातो. या जातीच्या शिमला मिरचीची रोपे किंवा झाडे उंच, मजबूत असतात तर फांद्या पसरत असतात. ही शिमला मिरचीची सुधारित जात सावलीच्या ठिकाणी चांगली वाढते.

सुरुवातीला या मिरचीचा रंग गडद हिरवा असतो, पण पिकल्यानंतर ती लाल रंगाची होते. या जातीच्या शिमला मिरचीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या जातीची मिरची लवकर खराब होत नाही. निश्चितच लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी या जातीची मिरची फायदेशीर ठरणार आहे.

ऑरोबेल (यलो शिमला मिरची) – जाणकार लोकांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, शिमला मिरचीची ही एक सुधारित जात आहे जी की भारत वर्षात उत्पादित केली जाऊ शकते. मात्र ही जात जात थंड हवामानात चांगली वाढते. त्याच्या फळांचा रंग पिकल्यानंतर पिवळा होतो आणि त्याचे वजन सुमारे 150 ग्रॅम असते.

शिमला मिरचीच्या या सुधारित जातीला रोग लवकर लागत नसल्याचा दावा केला गेला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, मिरचीचे हे वाण हरितगृहात आणि खुल्या शेतातही वाढू शकते. निश्चितच या जातीची शिमला मिरचीची शेती देखील शेतकऱ्यांना बक्कळ पैसा कमवून देणार आहे.

अर्का गौरव- ही देखील सिमला मिरचीची एक सुधारित जात आहे. या जातीच्या शिमला मिरचीच्या झाडाची पाने पिवळी व हिरवी असून फळे जाड लगद्याचे असतात. एका फळाचे सरासरी वजन 130-150 ग्रॅम असते. फळांचा रंग पिकल्यानंतर केशरी किंवा हलका पिवळा होतो. ही जात 150 दिवसांत काढणीसाठी तयार होत असल्याची माहिती जाणकार लोकांनी दिली आहे. तसेच शिमला मिरचीची ही सुधारित जात प्रति हेक्टर 16 टन पर्यंत सरासरी उत्पादन देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Ajay Patil