कृषी

Soybean Farming: बातमी कामाची! महाराष्ट्रासाठी जिल्हावार शिफारस केलेल्या सोयाबीनच्या नवीन जाती, जाणून घ्या सविस्तर

Published by
Ajay Patil

Soybean Farming: भारतात सध्या खरीप हंगामातील (kharif season) पिके जोमदार वाढीच्या अवस्थेत आहेत. राज्यातील खरिपातील पिके (kharif crops) देखील आता वाढीच्या अवस्थेत असून शेतकरी बांधव (farmer) पीक व्यवस्थापनासाठी (crop management) झटत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की भारतात खरीप हंगामात सोयाबीन (soybean crop) आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आपल्या राज्यात देखील सोयाबीन आणि कापूस या पिकाखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय असून अनेक शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण खरिपातील या दोन मुख्य पिकावरचं अवलंबून आहे. आपल्या राज्यात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आणि खानदेश मधील काही भागात सोयाबीन शेती बघायला मिळते. मराठवाडा आणि विदर्भ हे दोन विभाग सोयाबीनच्या शेतीसाठी संपूर्ण भारतात ओळखले जातात. अशा परिस्थितीत, आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांसाठी निर्गमित करण्यात आलेल्या काही प्रमुख सोयाबीन वाणांची (soybean variety) माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, ICAR आणि भारतीय सोयाबीन संशोधन संस्था (IISR) ही देशातील सोयाबीन संशोधन आणि विकासातील प्रमुख संस्था आहे. ही संस्था सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला देण्याचे काम करते तसेच सोयाबीनच्या शेतकर्‍यांना सोयाबीन वाणांची शिफारस करते. या संस्थेने आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी देखील काही सुधारित वाणांची शिफारस केली आहे. आज आपण या संस्थेने आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांची माहिती जाणून घेणार आहोत. दक्षिण महाराष्ट्रतील जिल्ह्यांनुसार शिफारस केलेले सोयाबीन वाण खालीलप्रमाणे आहेत.

IISR ने शिफारस केलेले वाण:- बीड, चंद्रपूर, परभणी, पुणे, हिंदगोली, लातूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर आणि यवतमाळसाठी – MACS 124, MACS 450, पंत सोयाबीन 1029, पूजा (MAUS 2), प्रतिकर (MAUS 61), प्रसाद (MAUS 32), Macs 13, JS 335, JS 80-21, Macs 58 आणि मोनेटा

मित्रांनो कोणत्याही सोयाबीन वाणाची पेरणी करण्यापूर्वी शेतकरी बांधवांनी एकदा कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी तज्ञांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.

 

Ajay Patil