कृषी

Success Story : एकाच यंत्राने करता येईल कोळपणी, पाडता येतील सऱ्या आणि होईल फवारणी, वाचा शेतकरी पिता-पुत्राची कमाल

Published by
Ajay Patil

Success Story :- शेती आणि शेतीमधील यंत्रांचा वापर आता या एकमेकांशी निगडित असणाऱ्या बाबी असून यांत्रिकीकरणाच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो. यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिले तर पैशांची बचत होते आणि काम देखील वेळेवर होऊन त्याला लागणारा कालावधी देखील कमीत कमी असतो. त्यामुळे या सगळ्या बाबींचा सकारात्मक परिणाम हा उत्पादन वाढीवर दिसून येतो.

शेतीची पूर्व मशागत ते पिकांची लागवड व अंतर मशागतीच्या कामापासून ते पिकांची काढणी इत्यादी कामांकरिता अनेक प्रकारची यंत्रे विकसित करण्यात आलेली आहेत. परंतु या सगळ्या यांत्रिकीकरणांमध्ये देखील काही संशोधक वृत्तीचे व्यक्ती जुगाड करून बऱ्याच प्रकारची यंत्रे तयार करतात व या यंत्राचा देखील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो.

तसेच अशा यंत्रांची किंमत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील ते विकत घेणे परवडते व कमीत कमी खर्चामध्ये आणि कमी कष्टात शेतीची कामे करता येणे शक्य होते. अशाच पद्धतीने  संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव या गावचे शेतकरी रामनाथ सोनवणे आणि त्यांचे पुत्र समाधान सोनवणे यांनी आधुनिक कोळपणी  यंत्राची निर्मिती केली असून शेतकऱ्यांना खूप फायद्याचे ठरणारे आहे.

 शेतकरी पितापुत्राने बनवले कोळपणी यंत्र

संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सोनवणे पिता-पुत्र यांचे वेल्डिंग शॉप असून हा त्यांचा वडिलोपार्जित असा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सांभाळतच त्यांनी शेतीला देखील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. याच वेल्डिंग शॉपच्या माध्यमातून सोनवणे यांनी  शेतकऱ्यांना कोळपणी करिता उपयुक्त ठरेल असे यंत्र बनवले असून त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या यंत्राची किंमत 30 ते 40 हजार रुपये असल्यामुळे शेतकरी ते खरेदी करू शकतात.

 कशा प्रकारचे आहे हे कोळपणी यंत्र?

दोन महिन्याच्या कालावधीत त्यांनी हे यंत्र तयार केले असून या यंत्राला पुढच्या साईडला पाच एचपीचे इंजन बसवण्यात आले आहे व ते स्वयंचलित आहे. या यंत्राला कार्यान्वित करण्याकरिता एक्सीलेटर सिस्टम  देण्यात आली असून यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हे यंत्र शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आणि फायद्याचे ठरणार आहे.

चिंचोली गुरव सारख्या छोट्याशा खेडेगावात राहत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती व वेल्डिंगचा व्यवसाय सांभाळला व या वेल्डिंग व्यवसायाच्या माध्यमातूनच या यंत्राची निर्मिती केली आहे. हे यंत्र अतिशय फायद्याचे असून या यंत्राच्या मदतीने शेतकऱ्यांना कापूस, मका तसेच सोयाबीन सारख्या पिकांमधील मशागतीची कामे देखील करता येणार आहेत. तसेच पिकांसाठी आवश्यक असलेले वाफे व सऱ्या पाडण्याकरिता देखील हे उपयुक्त यंत्र आहे.

एवढेच नाही तर या यंत्राच्या माध्यमातून फवारणी यंत्र देखील बसवता येणार असल्यामुळे येणाऱ्या काळात या यंत्राच्या  माध्यमातून पिकांवर फवारणी देखील करता येणार आहे. तसेच या यंत्राची परिसरामध्ये चर्चा असून अनेक शेतकरी हे यंत्र पाहण्यासाठी गर्दी करत आहे. एवढेच नाही तर येणाऱ्या कालावधीत नांगरणी आणि पेरणी करता येईल असे आधुनिक ट्रॅक्टर बनवण्याचा देखील मानस या पिता-पुत्रांचा आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil