Successful Farmer: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmers) शेती व्यवसायात (Farming) वेगवेगळे बदल स्वीकारू लागले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधव पीकपद्धतीत बदल करत असल्याचे बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात नगदी पिकांची (Cash Crops) शेती करू लागले आहेत.
यामध्ये (Medicinal Plant Farming) औषधी वनस्पतींची लागवड, नवनवीन (Vegetable Farming) भाजीपाला लागवड तसेच फुल शेतीचा (Floriculture) देखील समावेश आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील (Satara) सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील कोपर्डी हवेली येथील एका शेतकऱ्याने देखील आधुनिकतेची कास धरत शेतीव्यवसायात फुलशेतीच्या (Flower Farming) माध्यमातून आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे.
शरद चव्हाण नामक शेतकऱ्याने काळाच्या ओघात बदल करत बाजारपेठेचा अंदाज घेत शेवंती या फुलांची शेती (Mums Flower Farming) सुरू केली.
त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली आणि शेवंती फुलशेतीमधून (Shevanti Farming) लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली.
शरद रावांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आपल्या तांबड्या काळात जमिनीत शेवंती फुलाची लागवड केली. सध्या शेवंती फुलांची काढणी सुरू आहे. म्हणजे अवघ्या तीन महिन्यात शेवंतीचे फुलपिक उत्पादन देण्यास तयार झाले आहे.
शरदराव यांनी उत्पादित केलेली शेवंती मुंबई बाजारपेठेत चांगलाच भाव खात असून शेवंतीला 230 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. पहिल्याच तोड्यात शरदरावांना शेवंतीचे 67 किलो फुल मिळाले असून त्यातून जवळपास साडे 16 हजारांची कमाई झाली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत मिळत असलेला दर हा जास्त असल्याचे शरद राव नमूद करत आहेत.शरद राव यांना एक एकर शेतजमिनीत शेवंती शेतीला सुमारे दीड लाख रुपये खर्च लागला आहे.
यामध्ये ठिबक सिंचन प्रणालीचा तसेच मल्चिंग पेपरचा देखील समावेश आहे. आधुनिक पद्धतीने शरद राव यांनी शेवंती फुलाची लागवड केली आहे. याशिवाय शेवंती फुलावर रोगाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी केली जात आहे.
शेवंती फुलावर रोगाचे सावट कमी व्हावे या अनुषंगाने शरद राव यांनी आजूबाजूला झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे.मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, शेवंती फुलाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे.
याचा वापर सजावटीसाठी प्रामुख्याने केला जात असल्याने याला दर देखील चांगला मिळतो शिवाय बारामाही मागणी याला बघायला मिळते. यामुळे निश्चितच शेवंती शेती शरदरावांना बक्कळ पैसा उपलब्ध करून देणार आहे.
सध्या या फुलाचा पहिलाच थोडा विक्रीसाठी गेला असून अजून पाच ते सहा महिने या पिकातून त्यांना उत्पन्न मिळणार आहे. दर तीन ते चार दिवसांनी शेवंतीचा तोडा होत असल्याचे शरद राव यांनी सांगितले.
विशेष म्हणजे प्रत्येक तोड्याला शेवंतीचे उत्पादन वाढणार आहे. यामुळे शरद राव यांना खर्च वजा जाता शेवंतीच्या पिकातून सुमारे सात लाख रुपये उत्पन्नाची आशा आहे. निश्चितच शरद राव यांनी फुलशेतीच्या माध्यमातून मिळवलेले यश इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श रोवणार आहे.