कृषी

Successful Farmer: पुण्याच्या शेतकऱ्याचा नांद नाही करायचा..! युवा शेतकऱ्याने फुलवला केशर आंब्याचा मळा; लाखोंचा मिळाला नफा

Published by
Ajay Patil

Successful Farmer: पुणे (Pune) तिथे काय उणे असं पुणेकर नेहमी म्हणतं असतात. आता पुण्यात (Pune News) खरंच कशाचीच कमतरता भासणार नाही.

कारण पुणेकर कायमच नवनवीन गोष्टी आत्मसात करत असतात. पुण्यातील शेतकरी असतील तर मग काही विषयच नाही. पुण्यातील शेतकरी बांधव शेती (Farming) व्यवसायात नेहमीच नावीन्यपूर्ण बदल करत असतात.

येथील शेतकरी बांधव (Farmer) विशेषता शेती व्यवसायात आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी ओळखले जातात. जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथील एका नवयुवक शेतकऱ्याने देखील शेती व्यवसायात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

वैभव विठ्ठल शिंदे नामक एका नवयुवक शेतकऱ्याने पुणे जिल्ह्यात प्रथमचं केशर आंब्याची बाग (Mango Farming) फुलवून दाखवली आहे.

या शेतकऱ्याचा असा दावा आहे की पुणे जिल्ह्यात याआधी कोणीच केशर आंब्याचे उत्पादन (Kesar Mango Farming) घेतले नसून ते पहिले शेतकरी आहेत ज्याने पुणे जिल्ह्यात केशर आंब्याची यशस्वी शेती करून दाखवली आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जुन्नर तालुक्यात खूप पूर्वीपासून आंब्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र सघन पद्धतीने केशर आंब्याची शेती करण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे आणि याचा मान वैभव विठ्ठल शिंदे या नवयुवक शेतकऱ्याने उचलला आहे.

मित्रांनो शिंदे यांनी शेती व्यवसाय जरा हटके करण्याचा विचार करत केशर जातीचा आंबा लागवड केला आहे. त्यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात केशर जातीच्या आंब्याची लागवड केली आहे.

एवढ्या क्षेत्रात त्यांनी सुमारे दीड हजार रोपांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे या नवयुवक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला केशर आंबा शिवनेरी केशर नावाने बाजारात आणला गेला आहे.

आंबा पिकण्यासाठी कारपेट न वापरता सेंद्रिय पद्धतीने पिकवून त्याची विक्री करण्यात आली आहे.वैभव शिंदे यांनी शेती व्यवसायात काळाच्या ओघात मोठा बदल केला आहे.

या युवा शेतकऱ्याने इस्राईल शेती पद्धतीने म्हणजेच अतिघन पद्धतीने केशर आंब्याची लागवड करून दाखवली आहे. यांत्रिकीकरण तसेच छाटणी, खत- पाणी व्यवस्थापन, रोग व किडीचे एकात्मिक नियंत्रण केले आहे व पारंपरिक पद्धतीपेक्षा पीक पद्धतीत बदल करून, निर्यातक्षम आंब्याचे उत्पादन घेतले आहे.

आतापर्यंत या पद्धतीने या युवा शेतकऱ्याने एकूण साडेचार टन आंबा उत्पादन घेतले आहे. निश्चितच शेतीमध्ये केलेला हा बदल इतरांसाठी प्रेरणा देणारा आहे.

वैभव यांनी जुन्नरच्या मातीत केशर आंब्याची यशस्वी लागवड करून दाखवली आहे. भविष्यात इतर शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचे साधन देखील यामुळे निर्माण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ajay Patil