कृषी

महाराष्ट्राच्या पोरांचा नाद नाही करायचा! पट्ठ्याने मसाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गावातच मार्केट उभारल, अन पट्ठ्याच नाव भी गाजलं

Published by
Ajay Patil

Successful Farmer : मसाला शेती (Spice farming) करणाऱ्या शेतकर्‍यांना (Farmer) अनेकदा त्यांच्या मालाला योग्य भाव न मिळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे मसाला वर्गीय पिकांच्या विक्रीसाठी दुर्गम ग्रामीण भागात आज देखील बाजारपेठेची (Market) उपलब्धता नगण्य आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या खऱ्या किमतीशी तडजोड करावी लागते. अनेक राज्यांमध्ये कृषी (Agriculture) उत्पादनांच्या बाजारपेठेचाही अभाव आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने पिकांना रास्त भाव मिळण्याची आशा मावळली आहे. महाराष्ट्रातील नागपूर शहरातील (Nagpur) रहिवासी पुरुषोत्तम झामाजी भुडे यांनी आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या या समस्यांवर उपाय शोधला आहे. 

मसाल्यावर प्रक्रिया करण्यास सुरवात 

पुरुषोत्तम भिडे यांना गावातच राहून शेतीसोबत (Farming) व्यवसाय करायचा होता. शिवाय गावातील शेतकरी बांधवांना हमीची बाजारपेठ देखील उपलब्ध करून द्यायची होती. या अनुषंगाने 2017 पासून या दिशेने काम करत असल्याचे पुरुषोत्तम भुडे झामाजी यांनी सांगितले.

प्रक्रिया युनिट सुरू करण्यापूर्वी त्यांनी कृष्णा व्हॅली अॅडव्हान्स्ड अॅग्रिकल्चर फाउंडेशनकडून अॅग्री-क्लिनिक आणि अॅग्री-बिझनेस सेंटर (AC&ABC) योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी पाहिले की दर्जेदार आणि पोषक घटकांना हानी न पोहोचवता स्वदेशी तंत्राचा वापर करून मसाल्यांवर प्रक्रिया केली जाऊ शकते.

250 हून अधिक शेतकऱ्यांकडून थेट उत्पादन खरेदी करतात 

पुरुषोत्तम भुडे यांनी 2017 मध्ये त्यांच्या घराच्या मागील अंगणात मसाल्यांचे प्रोसेसिंग युनिट बसवले. त्यानंतर मसाला उत्पादक शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करू लागले.  असे करता करता अनेक गावातील शेतकरी त्यांच्यात सामील होत गेले आणि एक मोठ साम्राज्य तयार झाल.

आज जवळपास 250 शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले आहेत, ज्यांच्याकडून ते थेट शेतमाल खरेदी करतात. पुरुषोत्तम भुडे सांगतात की, त्यांनी सुरुवात मसाल्यापासून केली होती, आता ते गहू, तांदूळ आणि डाळीही शेतकऱ्यांकडूनच खरेदी करतात. यामुळे शेतकऱ्यांना आता आपला माल विकण्यासाठी भटकावे लागत नाही आणि त्यांना योग्य भाव मिळतो.

त्यांच्याकडे सावी नॅचरल फार्मिंग या नावाने हे प्रोसेसिंग युनिट आहे. यामध्ये ते मिरची, हळद, लसूण, लवंग, मेथी, धणे, जिरे अशा अनेक मसाल्यांवर प्रक्रिया करून त्यांचे ब्रँडिंग आणि पॅकेजिंग करतात. काही वेळा जास्त मागणी असताना ते इतर राज्यातील शेतकऱ्यांकडून मसाल्यांचे उत्पादनही विकत घेतात. 2020-21 मध्ये महाराष्ट्रात सुमारे 82 हजार हेक्टरमध्ये सुमारे 4.24 लाख टन मसाल्यांचे उत्पादन झाले.

परिसरातील लोकांना त्यांच्या व्यवसायाशी जोडले 

प्रक्रिया युनिटमध्ये 12 लोक कायमस्वरूपी काम करतात. याशिवाय सुमारे 10 जण रोजंदारीवर काम करतात.  पुरुषोत्तम झामाजी भुडे म्हणाले की, आगामी काळात आणखी अनेक तरुणांना आपल्याशी जोडण्याचे ध्येय ठेवून ते काम करत आहेत. 

Ajay Patil