कृषी

Success: भावा नांदच खुळा…! भावड्याने टोमॅटो लागवड केली अन अवघ्या एका एकरात 10 लाखांची कमाई झाली, वाचा शेतकऱ्याच्या यशाचे गुपित

Published by
Ajay Patil

Successful Farmer: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. येथील बहुसंख्य जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेती क्षेत्रावर अवलंबून आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा हाकला जातो. मात्र असे असले तरी अनेकदा शेतकरी बांधवांना (Farmer) हवामानाच्या बदलाचा (Climate Change) तसेच बाजार भावाचा (Market Price) फटका बसल्याने नुकसान सहन करावे लागते.

परंतु असे असताना देखील अनेक शेतकरी बांधव काळाच्या ओघात शेती (Farming) व्यवसायात बदल करून बाजारपेठेचा अंदाज घेऊन व्यवसायातून लाखो रुपये उत्पन्न (Farmers Income) कमावण्याची किमया साधता आहेत.

जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्याच्या एका शेतकऱ्याने देखील टोमॅटो शेतीमध्ये (Tomato Farming) योग्य नियोजन व त्याला अपार कष्टाची सांगड घालत लाखो रुपये उत्पन्न कमवून दाखवले आहे.

जाफराबाद तालुक्यातील बोरखेडी चिंच येथील नवयुवक शेतकरी रमेश कडुबा कदाळे यांनी एक एकर टोमॅटो शेतीतुन (Tomato Cultivation) तब्बल 10 लाखांची कमाई करून सर्व्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

रमेश आपल्या वडिलोपार्जित शेतीत उसाची लागवड (Sugarcane Farming) अनेक वर्षांपासून करत आले आहेत. यासोबतच रमेश आपल्या शेतात भाजीपाला वर्गीय पिकांची देखील शेती करत असतात.

भाजीपाला वर्गीय पिकांसाठी रमेश यांनी आपली 2 एकर शेतजमीन राखून ठेवली आहे. खरं पाहता ऊस हे नगदी पीक आहे मात्र रमेश यांना उसाच्या शेतीपेक्षा भाजीपाला वर्गीय पिकांच्या शेतीतूनच अधिक उत्पन्न मिळत आहे.

अल्प कालावधीत काढणीसाठी येणारे भाजीपाला पीक रमेश यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. यावर्षी तर रमेश यांना केवळ एक एकर टोमॅटो पिकातून तब्बल 10 लाखांची कमाई झाली आहे.

यामुळे रमेश यांना अतिरिक्त उत्पन्न मिळतं आहे.मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटी रमेश या प्रयोगशील शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली.

फेब्रुवारीत लावलेल्या टोमॅटोचे मे महिन्यात उत्पादन मिळू लागले. मे अखेरपर्यंत त्यांना या शेतीतून तब्बल 10 लाखांचे उत्पन्न मिळाल्याची त्यांनी माहिती दिली.

यावर्षी टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याने आणि त्यांनी उत्पादित केलेल्या टोमॅटो चांगल्या दर्जाचे असल्याने त्यांच्या टोमॅटोंना प्रती कॅरेट 1 हजार ते एक हजार 300 चा भाव मिळाला.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना पारंपारिक पीक पद्धतीत मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र शेतकरी बांधवांनी जर काळाच्या ओघात पीक पद्धतीत बदल केला तर निश्चितचं त्यांना रमेश प्रमाणे लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त होऊ शकते. एकंदरीत रमेश यांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श रोवला आहे.

Ajay Patil