कृषी

भावांनो नांदखुळा कार्यक्रम!! दोन दोस्तांनी जिरेनियम शेतीच्या माध्यमातून केली तब्बल 25 लाखांची कमाई, वाचा सविस्तर

Published by
Ajay Patil

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmers) काळाच्या ओघात आता शेती व्यवसायात (Farming) मोठा अमूलाग्र बदल करत आहेत.

विशेष म्हणजे शेतीमध्ये केलेला हा बदल शेतकऱ्यांसाठी फायद्याचा देखील सिद्ध होत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना शेती व्यवसायात बदल करण्याचा सल्ला देतात.

पीक पद्धतीत बदल केला आणि बाजारात जे विकते तेच पिकवले तर निश्चितच शेतकऱ्यांना मोठा फायदा (Farmers Income) होत असतो. याचेच एक साजस उदाहरण समोर आल आहे ते (Nashik) नाशिक जिल्ह्यातून.

येवला तालुक्यातील दोन शेतकरी मित्रानी काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत लाखों रुपये उत्पन्न कमवण्याची किमया साधली आहे. येवला तालुक्यातील अंदरसुल व वडगाव येथील दोन तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने जिरेनियम शेती (Geranium Farming) करून तब्बल 25 लाखांचे उत्पन्न कमविले आहे.

अनिल धनगे व त्याचा मित्र किरण पवार या दोघांनी शेतीमध्ये काहीतरी जरा हटके करण्याचा विचार केला. या अनुषंगाने त्यांनी प्रथम पारंपारिक पीक पद्धतीला बाजूला सारत औषधी वनस्पतींच्या लागवडीचा विचार केला.

मग काय दोघं नवयुवक तरुणांनी आपल्या पाच एकर शेतजमीनीत जिरेनियमची लागवड केली. जिरेनियम लागवड (Geranium cultivation) केल्यानंतर आधुनिक व तंत्रशुद्ध पद्धतीने जिरेनियम ची यशस्वी उत्पादन घेतले आणि अवघ्या पाच एकर क्षेत्रातून लाखो रुपयांची कमाई केली.

या 2 नवयुवकांचा हा अनोखा उपक्रम निश्चितच इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा असून भविष्यात औषधी वनस्पतीच्या शेतीकडे (Medicinal Plant Farming) शेतकरी बांधव पुढे सरसावतील यात तिळमात्रही शंका नाही.

मित्रांनो पारंपरिक शेतीतून (Traditional Farming) गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना फार कवडीमोल उत्पन्न मिळत आहे. यामुळे केवळ उदरनिर्वाह भागवता येतो.

मात्र जर शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करायची असेल तर निश्चितच बाजारात जे विकते तेच पिकवणे महत्त्वाचे ठरते. या 2 नवयुवकांनी देखील हीच बाब लक्षात घेऊन जिरेनियम शेतीचा मार्ग निवडला.

आपल्या पाच एकर शेत जमिनीत या नवयुवकांनी जिरेनियमची सुमारे 50 हजार रोपांची लागवड केली. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणाली उपयोगात आणली गेली.

यासाठी या शेतकरी बांधवांना सुमारे चार लाख रुपयांचा खर्च आला. जिरेनियम ला बाजारपेठेत विशेष मागणी असल्याने या दोघांनी जिरेनियम शेतीचा निर्णय घेतला.

हा निर्णय या दोघांसाठी आता फायद्याचा ठरत असून त्यांना या पाच एकरातून जवळपास पंचवीस लाख रुपये कमाई होण्याची आशा आहे. निश्चितच या दोन मित्रांचा हा भन्नाट आणि नावीन्यपूर्ण प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मोठा प्रेरणा देणारा सिद्ध होणार आहे.

Ajay Patil