Sugarcane Farming : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या उसाच्या नवीन जातीला भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रिय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त या बैठकीत राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या गहू ज्वारी तूर तीळ वं उडीदाच्या जातीला देखील मान्यता मिळाली आहे. निश्चितच यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.
कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या उसाचा फुले ११०८२ (कोएम ११०८२), गव्हाचा फुले अनुपम, रब्बी ज्वारीचा फुले यशोमती, तूरीचे फुले तृप्ती व फुले कावेरी, तीळ पिकाचा फुले पुर्णा आणि उडदाचा फुले वसु या वाणांचा समावेश आहे. दरम्यान आज आपण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या उसाच्या फुले ११०८२ या जातीच्या विशेषता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फुले 11082 (कोएम 11082) विशेषता
राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा नवीन वाण लवकर पक्व होणारा आहे. याच ऊस उत्पादनात १५.४० टक्के, साखर उत्पादन १३.५२ टक्के आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, हा वाण तुल्यवाण कोसी ६७१ पेक्षा सरस आढळून आला आहे. यामुळे निश्चितच ऊस उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे.
यामध्ये साखर उतारा १४.१७ टक्के मिळाला आहे. कोसी ६७१ या उसाच्या वाणांचा देखील साखर उतारा 14.17 टक्के एवढाच आहे. निश्चितच कृषी विद्यापीठाने नव्याने विकसित केलेल्या या जातीमुळे ऊस उत्पादकांना आर्थिक लाभ मिळणार आहे.
साखर उतारा या उसाच्या जातीचा चांगला असल्याने शेतकरी बांधवांना अधिक दर मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रातील ऊस लागवडीखालील क्षेत्राचा विचार केला असता ही बातमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी निश्चितच आनंदाची ठरणारी आहे.